Fertilizer Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season 2023 : खते, बियाणे खरेदीकडेही शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

Monsoon Update : बिपॉरजॉय चक्रीवादळ आणि एल निनोच्या परिणामांमुळे मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जूनच्या सुरुवातीला पेरणीची तयारी सुरू करणारे शेतकरी यंदा चिंतेत आहेत.

Team Agrowon

Nashik News : बिपॉरजॉय चक्रीवादळ आणि एल निनोच्या परिणामांमुळे मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जूनच्या सुरुवातीला पेरणीची तयारी सुरू करणारे शेतकरी यंदा चिंतेत आहेत. जिल्ह्यात यंदा खरिपात खतांचा मुबलक प्रमाणात पुरवठा झाला आहे.

मात्र, पाऊस लांबल्याने खतांची उचल झालेली नाही. तर, शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीकडे सपशेल पाठ फिरविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात विविध गोदामे, दुकाने आदी ठिकाणी मिळून तब्बल एक लाख टन खते पडून आहेत.

नाशिक जिल्हा खतांच्या वापरामध्ये राज्यात आघाडीवर असल्याने खरिपात मोठ्या प्रमाणात खतांची गरज असल्याने मागणीदेखील अधिक करावी लागते. त्यादृष्टिने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खरीप हंगामासाठी निश्चित केलेल्या ६ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रासाठी २ लाख ५८ हजार टन खतांची मागणी नोंदविली होती.

यापैकी २ लाख २८ हजार ८६० टन खत साठा मंजूर झाला आहे. गतवर्षीचा ९९ हजार ९३८ टन खतसाठा शिल्लक असून जून अखेर १ लाख ५३ हजार ८३९ टन प्राप्त झालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ८८६ टन खतसाठा उपलब्ध आहे. मात्र, जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे.

जून महिना अर्धा होऊनही देखील मॉन्सूनच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावलेली नाही. पावसाने ओढ दिलेली असल्याने बाजारात खतांची हवी तशी उचल झाली नाही. जिल्ह्यात दर महिन्याला खतांचा सुरळीत व हवा तेवढा किंवा लक्ष्यांकानुसार पुरवठा खत कंपन्यांनी केला.

मात्र, मागणीअभावी खते पडून आहेत. जिल्ह्यात युरिया, संयुक्त खते, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश अशी सर्वच खते कमी अधिक प्रमाणात पडून आहेत. डीएपी अधिक प्रमाणात पडून असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे मिळाली.

खतसाठा पडून असताना दुसरीकडे बियाणे खरेदीसाठी देखील शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार १ लाख ५ हजार १७४ क्विटंल बियाणे मंजूर झाली आहेत. यापैकी ८२ हजार ७७१ क्विंटल बियाणांचा पुरवठा झाला आहे. यात बाजारात केवळ १ हजार ७९९ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली झाली आहे.

खरीप हंगामासाठी लागणारे खतसाठा व बियाणे याचा पुरवठा झाला आहे. खते व बियाणे विक्रेत्यांची बैठक घेतली असता यात, खते व बियाणे यांना उचल नसल्याचे, विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. पाऊस आणखी लांबणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पाऊस लांबल्यावर आपत्कालीन पीक नियोजन देखील कृषी विभागाने करून ठेवले आहे.
- कैलास शिरसाठ, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT