kharif Season Seed : बियाण्याची उगवणक्षमता तपासण्याच्या पद्धती

Kharif Hangam : खरीप हंगामाची पूर्वतयारीच्या नांगरणी, ढेकळे फोडणे, कुळवणे, धसकट वेचणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, शेणखत टाकणे, काट्या वेचणे, जमीन भुसभुशीत करणे, सरी किंवा वाफे तयार करणे इ. कामांना वेग आला आहे.
Seed Demand
Seed DemandAgrowon
Published on
Updated on

माधुरी आवटे, गणेश चवरे

Kharif Season : खरीप हंगामाची पूर्वतयारीच्या नांगरणी, ढेकळे फोडणे, कुळवणे, धसकट वेचणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, शेणखत टाकणे, काट्या वेचणे, जमीन भुसभुशीत करणे, सरी किंवा वाफे तयार करणे इ. कामांना वेग आला आहे.

पेरणीसाठी बियाण्यांचे नियोजन केले जात आहे. मात्र पूर्वतयारीमध्ये बियाण्याचे उगवणक्षमता तपासणी करून घेणेही तितकेच गरजेचे असते. संत तुकाराम महाराजांचा “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” हा अभंग कायम लक्षात ठेवावा.

अनेक शेतकरी स्वतःचे किंवा घरगुती उपलब्ध धान्यांचा वापर बियाणे म्हणून पेरणीसाठी करतात. मात्र असे बियाणे पेरणीसाठी वापरण्यापूर्वी उगवण क्षमता, शुद्धता, अन्य जातींच्या पिकांचे भेसळ, रोगट किंवा फुटके बियाणे याकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांची उगवण चांगली होत नाही.

यातून अनेक वेळा केवळ थोडे आर्थिक नुकसान होते असे नाही, तर पेरणीचा हंगामही वाया जाण्याचा धोका असतो. हंगामपूर्व कामामध्ये बियाण्यांचा उगवणक्षमता तपासण्याचेही एक महत्त्वाचे काम प्रत्येक शेतकऱ्याने अंतर्भूत केले पाहिजे. घरगुती बियाण्याची उगवणक्षमता कशा प्रकारे तपासावी याची माहिती घेऊ.

बीज परीक्षण म्हणजे काय?

चांगल्या प्रतीच्या बियाण्यासाठी त्यांची भौतिक आणि आनुवंशिक शुद्धता राखावी लागते. यासाठी बीजोत्पादन, बीज प्रक्रिया, बीज परीक्षण, प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण, साठवण, पॅकिंग आणि विक्री यामध्ये विशिष्ट प्रकारची योग्य ती काळजी घ्यावी लागते. बियाण्याची पेरणीसाठी उपयुक्तता पाहणे यालाच बीज परीक्षण असे म्हणतात.

यात बियाण्याच्या वेगवेगळ्या बाबी तपासल्या जातात. त्यात बियाण्याची उगवणक्षमता, जोम, आरोग्य, भेसळ (म्हणजेच भौतिक शुद्धता), त्यातील ओलाव्याचे प्रमाण इ.चा समावेश होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरेदी केलेले बियाणे खूण चिठ्ठीवरील माहितीप्रमाणे त्या प्रतीचे आहे का, हे तपासले जाते.

Seed Demand
Bogus Seed : राज्यात बोगस बियाण्यांच्या रॅकेटमुळे शेतकऱ्यांची फसवणूक

बियाण्याची उगवणक्षमता कशी तपासावी?

- बियाण्याच्या एखाद्या लॉटची उगवणक्षमता तपासण्यासाठी त्यातील कमीत कमी ४०० बी तपासावे लागतात.

- उगवणक्षमता तपासण्यासाठी घेतलेल्या बियाण्यांवर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी. ते शुद्ध बियाण्यातून घेतलेले असावे.

- शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाण्याची पेरणीपूर्व उगवणक्षमता चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे पेरणी करतेवेळी बियाण्याचे एकरी प्रमाण निश्‍चित करता येते.

- बियाण्याची चाळणी करून त्यामधील काडीकचरा, खडे, लहान व खुरटलेले बियाणे वेगळे करावे.

- स्वच्छ झालेले समान आकाराचे बियाणे उगवणक्षमता चाचणीसाठी निवडावे.

- प्रयोगशाळेत उगवणक्षमता तपासण्यासाठी प्रामुख्याने उगवण कक्ष (जर्मिनेटर) हे उपकरण वापरले जाते. यात बियाणे उगवण्यासाठी आवश्यक ते तापमान आणि आर्द्रता राखता येते. बियाणे उगवणीस ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या कागदामुळे (टॉवेल पेपर) ओलावा राखला जातो.

उगवणक्षमता तपासण्याच्या पद्धती

बियाण्याची उगवण क्षमता म्हणजे एखाद्या बियाण्यामध्ये उगवून येण्याची क्षमता किती आहे, ते तपासण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब केला जातो.

उगवलेल्या रोपांचे वर्गीकरण

- साधारण किंवा चांगली रोपे (Normal Seedings) ः उगवणक्षमता चाचणीत ८-१० दिवसात बियाणे उगवते. ज्या रोपांची चांगली वाढ झालेली असते आणि ज्यांची अनुकूल परिस्थितीत चांगल्या झाडामध्ये रूपांतर होण्याची क्षमता असते. त्यांना साधारण किंवा चांगली रोपे असे संबोधले जाते.

या रोपांच्या सर्व भागांची वाढ व्यवस्थित झालेली असते. मुळांची वाढ चांगली होऊन त्यावर तंतूमुळे वाढलेली असतात. व्यवस्थित वाढलेली रोपे परंतु थोडी मुळांची खुरटलेली वाढ अशी रोपे सुद्धा साधारण किंवा चांगल्या प्रकारात मोडतात. व्यवस्थित वाढलेली रोपे परंतु त्यांना बाहेरील बुरशीचा संसर्ग झाला असला तरी अशी रोपेसुद्धा चांगल्या प्रकारात मोडतात.

- विकृत रोपे (Abnormal Seedings) ः जी रोपे अनुकूल परिस्थितीत सुद्धा व्यवस्थित वाढू शकत नाही, त्यामध्ये पूर्ण झाडांमध्ये रूपांतरित होण्याची क्षमता नसते. त्यांच्या कोंब आणि मुळांना इजा पोहचलेली असते. बियाण्यांशी निगडित असलेल्या बुरशीमुळे रोपे कुजण्याच्या अवस्थेत असतात.

- कठीण बी (Hard Seed) बी उगवणीला ठेवल्यानंतर ८-१० दिवसांत अजिबात उगवत नाहीत. काही बियाणे पाणी न शोषल्यामुळे उगवत नाही. यांनाच कुचर किंवा कठीण बी (Hard Seed) म्हणतात. मात्र काही बी हे त्याच्या सुप्त अवस्थेत असल्यामुळे उगवत नाही.

अशा बियांना सुप्तावस्थेतील बी (Dormant seed) म्हणतात. काही बी मेलेले (Dead seed) असते. पोकळ बियाणे, किडलेले बियाणे, गर्भ (embryo) नसलेले बियाणे हे सर्व याच प्रकारात मोडतात.

- अशाप्रकारे उगवलेल्या बियाण्यांची वर्गवारी करावी. त्यातील साधारण किंवा चांगल्या उगवलेल्या बियांची टक्केवारी काढतात. प्रत्येक पिकांमध्ये प्रमाणीकरण यंत्रणेने उगवणीची टक्केवारी प्रमाणित केलेली आहे. बीजोत्पादन केलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता या प्रमाणापेक्षा कमी असल्यास बीजोत्पादनही नापास होऊ शकते. प्रमाणकापेक्षा जास्त उगवण असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरावे.

शोषकागदावर बियाणे ठेवणे (Top of paper)

- या पद्धतीमध्ये लहान आकाराच्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासता येते. यामध्ये एका काचेच्या प्लेटमध्ये खाली कापसाचा पातळ थर ठेवून त्यावर शोष कागद ठेवला जातो. त्यावर पाणी टाकून ओले करावे. अतिरिक्त पाणी निथळून घ्यावे.

अशा प्लेटमध्ये बी ठेवून त्यावर झाकण लावावे. ओलावा टिकून राहील याची काळजी घेत या प्लेट उगवण कक्षामध्ये (जर्मिनेटर) किंवा चांगल्या प्रकारे आर्द्रता (७० टक्क्यांपेक्षा जास्त) असलेल्या बंद खोलीत ठेवावे.

कागदामध्ये बियाणे ठेवून उगवणक्षमता तपासणे (Between paper)

उगवणक्षमता तपासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारचे दोन कागद (टॉवेल पेपर) ओले करून केलेल्या कागदामध्ये बी मोजून ठेवावे.

असे कागद गोल गुंडाळी करून त्यावर मेणकागद (वॅक्स पेपर) खालच्या ३/४ भागास गुंडाळून ती उगवणीसाठी आवश्यक असणाऱ्या तापमान आणि आर्द्रता असलेल्या जर्मिनेटरमध्ये ठेवतात. ओले कागद बोटाने दाबले असता बोटाभोवती पाणी दिसू नये, इतपतच कागद ओला असावा.

Seed Demand
Cotton Seed Selling : कापूस बियाणे चढ्या दराने विकणाऱ्या सहा दुकानांचे परवाने निलंबित

वाळूमध्ये उगवणक्षमता पहाणे (Sand) कुंडी किंवा ट्रेमध्ये ओल्या वाळूत १ ते २ सें.मी. खोलीवर सारख्या अंतरावर मोजून बी ठेवावे. बियाच्या आकारमानावर वाळूचा ओलेपणा ठरवतात. अशा कुंड्या जर्मिनेटर किंवा अंधाऱ्या आर्द्रतायुक्त खोलीमध्ये उगवणीसाठी ठेवतात. बियाणे उगवणीसाठी ठेवताना ते एकसारख्या अंतरावर ठेवावे.

त्यासाठी ओलावा प्रमाणातच ठेवावा. तसेच बियाण्यास आवश्यक असणारे तापमान आणि आर्द्रता राखण्याचा प्रयत्न करावा. साधारण ८-१० दिवसांत बियाण्याची उगवण होते.

वर्तमान पत्राचा कागद वापरून बियाणे तपासणी

वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याला चार घड्या पाडाव्यात, त्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. बियाण्याच्या प्रत्येकी दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवाव्यात. त्याची गुंडाळी करावी.

अशा रीतीने शंभर बियांच्या दहा गुंडाळ्या तयार कराव्यात. नंतर या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसांनंतर त्यामधील बीजांकुर मोजावे. पान १४ वर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com