Supriya Sule Agrowon
ताज्या बातम्या

Shimla Mirchi Production : कांबळेश्‍वरच्या पवारांचा सिमला मिरची उत्पन्नात हातखंडा

capsicum Production : ९ एकर क्षेत्रामध्ये पवार कुटुंबीयांनी सध्या ऊस, जनावरांचा चारा आदी पारंपरिक पिकांबरोबर पेरू आणि पॉलिहाउसच्या माध्यमातून सिमला मिरचीचे उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

कल्याण पाचांगणे ः सकाळ वृत्तसेवा

Baramati News : पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पॉलिहाउससारखे विविध प्रयोग राबविल्यास निश्‍चितपणे त्या शेतीतून अधिक उत्पन्न मिळू शकतात, याचे उत्तम उदाहरण कांबळेश्‍वर (ता. बारामती) येथील पोपटराव गणपत पवार व प्रदीप पोपटराव पवार या बापलेकांनी आपल्या शिवारात निर्माण केले आहे.

९ एकर क्षेत्रामध्ये पवार कुटुंबीयांनी सध्या ऊस, जनावरांचा चारा आदी पारंपरिक पिकांबरोबर पेरू आणि पॉलिहाउसच्या माध्यमातून सिमला मिरचीचे उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

विशेषतः २००३ पासून सिमला मिरचीचा प्रयोग यशस्वी करण्यात त्यांचा हातखंडा झाला आहे. शेतकरी विकासाच्या दृष्टीने दिशादर्शक ठरलेल्या वरील प्रयोगाची माहिती माळेगावचे कार्यकर्ते गौरव जाधव यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनास आणून दिली.

मंगळवारी (ता. ६) सौ. सुळे बारामती-कांबळेश्‍वरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला अधिक प्राधान्य देणारे पोपटराव पवार व प्रदीप पवार या शेतकऱ्यांचे या वेळी सुळे यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच त्यांनी पॉलिहाउसमधील भेडसावणाऱ्या समस्यांचीही आवर्जून माहिती घेतली.

या वेळी शेतकरी प्रदीप पवार म्हणाले, की बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) मार्गदर्शनाखाली पारंपरिक शेती बरोबर आधुनिक टेक्नॉलॉजीच्या आधारे १५ वर्षांपूर्वी शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हे तंत्र शिवारात राबविताना खूप अडचणी आल्या, परंतु हार मानली नाही. केव्हीकेच्या तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली २००३ मध्ये पॉलिहाऊस शेड उभारले. त्या कामासाठी शासनाचे अनुदानही मिळाले. सुरुवातीला पाच गुंठ्यांमध्ये तीन वेगवेगळी पॉलिहाउस उभारली.

त्यामध्ये मुख्यत्वेकरून सिमला मिरचीचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला. केवळ उत्पन्नच घेतले नाही, तर त्या मालाच्या बाजारपेठेचा चांगला अभ्यास केला. परिणामी, या व्यावसायात पारंपरिक शेतीपेक्षा अधिक पैसे मिळू लागले.

त्यानंतर २०१४ मध्ये २२ गुंठ्यांमध्ये १ आणि १० गुंठ्यांमध्ये १ अशी मोठी दोन पॉलिहाउस शेड उभारली. इतर पिकांच्या तुलनेत सिमला मिरची पीक घेण्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले. सध्याला या व्यवसायातून अडीच कोटींपेक्षा अधिक उलाढाल करत आहे.

या वेळी बारामती पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे, सोमेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, दूध संघाचे माजी अध्यक्ष संदीप जगताप, बारामती सहकारी बॅंकेचे सचिन सातव, मार्केट कमिटीचे सभापती सुनील पवार, प्रमोद काकडे, राजवर्धन शिंदे, गौरव जाधव आदी कांबळेश्‍वरचे पदाधिकारी उपस्थित होते.

पॉलिहाउस विम्याचा मुद्दा संसदेमध्ये जाणार

खासदार सुळे म्हणाल्या, की कांबळेश्‍वर येथील प्रदीप पवार यांनी जुन्या पॉलिहाउसला शंभर टक्के विमा लागू झाला पाहिजे, अशी मागणी केली. अर्थात, ही मागणी राज्यभरातून शेतकऱ्यांची येत आहे. त्यामुळे पॉलिहाउसचा विम्याचा मुद्दा संसदेमध्ये मांडण्यास मी कटिबद्ध आहे. पाणी व खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोपट पवार यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी ऊस, जनावरांचा चारा, पेरू आणि पॉलिहाउसमध्ये ढोबळी मिरचीचे घेतलेले यशस्वी पीक निश्‍चितच इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Shortage : खत टंचाईवरून कर्नाटकच्या विधानसभेत गोंधळ; एकेरी उल्लेख करत सत्ताधारी व विरोधक भिडले

MGNREGA Wages : पैसे द्या, पैसे द्या… ‘कुशल’चे पैसे द्या

Agriculture Electricity : शेतीपंपासाठी सिंगल फेज वीजपुरवठा वापरू नये

Orange Orchard : बुरशीजन्य देठसुकी, फांदी मर, फळगळ व्यवस्थापन

Agriculture Scheme: केंद्र सरकारकडून ठिबक, तुषार सिंचनासाठी मिळणार ५५ टक्क्यांपर्यंत अनुदान

SCROLL FOR NEXT