Supriya Sule : केंद्र सरकारमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले ः सुप्रिया सुळे

Indian Agricultute : राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप
Supriya Sule
Supriya Sule Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Central Government: मुंबई : डाळींचे दर (Dal Rate) वाढण्यामागे केंद्र सरकारकडे अभ्यासू धोरण नाही. जगभरात कांद्याचा तुटवडा असताना महाराष्ट्रात मात्र कांदा फेकून द्यावा लागला.

कांदा निर्यात करा असे, आम्ही केंद्र सरकारला सांगत होतो, मात्र त्यांनी ऐकले नाही.

केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी (ता. ७) पत्रकार परिषदेत केला.

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळत चालली आहे. हे आताच का घडतेय, असा सवालही त्यांनी केला.

सुळे म्हणाल्या, की डाळींचे दर वाढले आहेत याचे मला आश्‍चर्य वाटत नाही, कारण दोन वर्षे सातत्याने संसदेत वाढत्या अन्नधान्याच्या किमतीवर मी बोलत आहे.

केंद्र सरकारकडे स्टडी पॉलिसी नाही. आज ना कांद्याला भाव आहे, ना इतर वस्तूंना आहे. शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. यामध्ये केंद्र सरकारचे सातत्याने गैरव्यवस्थापन दिसून येते.’’

Supriya Sule
Supriya Sule Market Visit : ...अन् सुप्रिया सुळेंनी गाठली थेट भाजी मंडई!

मुलींच्या सुरक्षितेबाबत अनास्था
मुंबईतील मुलींच्या वसतिगृहात झालेल्या बलात्कार प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या, की मुंबईत वसतिगृहात मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एकतर महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्र सरकार गंभीर आहे ना महाराष्ट्र सरकार गंभीर आहे.

महिलांचे, मुलींचे वसतिगृह आहे तिथे कॅमेरे व चांगली लॉकिंग सिस्टीम व मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य दिलेच पाहिजे. आता तर सातत्याने मुलींच्या किंवा महिलांच्या विरोधात ज्या घटना घडत आहेत त्याबाबत केंद्र व राज्य सरकारचा दृष्टिकोन लक्षात येतो.

ज्याने कृत्य केले त्याने आत्महत्या केली आहे. त्यामुळे आता पहिल्यांदा वसतिगृहाची सुरक्षितता, त्यामध्ये हेल्पलाइन असतील, अलार्म बेल आणि कॅमेरे यांना प्राधान्य देत सरकारने लवकर पावले टाकली पाहिजेत.

भाजप सत्तेत आल्यापासून वातावरण दूषित
‘‘मला गंमत आणि आश्‍चर्य एका गोष्टीचे वाटते की जेव्हापासून भाजप सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून सारखे वातावरण दूषित का होते आहे.

अहमदनगरची घटना घडली आता कोल्हापूरमध्ये घटना घडली आहे. सारखेच तणावाचे वातावरण राज्यात कसे होते? अशाच गोष्टी घडत राहिल्या, दंगली होत राहिल्या तर यामुळे राज्याचे नुकसान होइल. हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे,’’ असेही त्या म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com