Agricultural pump
Agricultural pump Agrowon
ताज्या बातम्या

Suicide Attempt For Agricultural Pump : शेतकऱ्याचा कृषिपंपाच्या विजेसाठी आत्महत्येचा प्रयत्न

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : शेतातील कृषिपंपाला (Agricultural Pump) वीज मिळत नसल्याने अर्धापूर तालुक्यातील लोणी (Loni) येथील शेतकऱ्याने अर्धापूर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ही घटना मंगळवारी (ता.११) घडली. सोमवारीही (ता.१०) नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात एका ज्येष्ठ शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

अर्धापूर तालुक्यातील लोणी बुद्रूक येथील शेतकरी केरबा पाटील-भुसे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मागील काही दिवसांपासून वीज नाही. त्यामुळे विहिरीत पाणी असूनही ते पिकाला देता येत नाही. अवघ्या दोन महिन्यांत केळीचे उत्पादन हाती येणार आहे.

यामुळे हाता-तोंडाशी आलेली लाखोंची केळी पाण्याअभावी वाळत आहे. विद्युत पुरवठा सुरू करावा, अशी मागणी पाटील-भुसे यांनी वीज वितरण कंपनीकडे वारंवार केली. मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान, मंगळवारी (ता. ११) सकाळी शेतकरी भुसे हे शहरातील अर्धापूर कार्यालयात आले. तेथील वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतीपंपाला वीज का मिळाली नाही, असे विचारले असता त्यांना अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

यामुळे भुसे यांनी महावितरण कार्यालयातील छताच्या लोखंडी रॉडला दोरी बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला.


‘उपकार्यकारी अभियंत्यास निलंबित करा’
मागील १२ दिवसांपासून विद्युत पुरवठा नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ‘महावितरण’चे उपकार्यकारी अभियंता अविनाश रामगीरवार, लोणी येथील लाइनमन बंबरुडे यांना निलंबित करावे, या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंत्याकडे दिले.

निवेदनावर विशाल बुटले, हनुमान पाटेकर, गंगाधर बल्लेवाड, बालाजी बुटले, शिवकुमार कापसे, वेंकटेश बुटले, केरबा कापसे, सोमनाथ आसेगावकर, तानाजी भुसे, दत्तराव आसेगावकर, अमोल बुटले, अप्पाराव बुटले, आनंदा भोसले आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

Flower Disease : फ्लॉवर पिकातील ‘गड्डा सड रोग’

Panchayat Development : पंचायत विकासाची नोंदणी

SCROLL FOR NEXT