आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

कोल्हापूर : ‘रयत अ‍ॅग्रो’च्या कडकनाथ कोंबडीपालन घोटाळ्यात आर्थिक फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून विष प्यायलेल्या प्रमोद सर्जेराव जमदाडे (२५, रा. मसूद माले, ता. पन्हाळा) या तरुण शेतकऱ्याचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी  (ता. २१) मृत्यू झाला. कडकनाथ फसवणूक प्रकरणात जिल्ह्यातील पहिला बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. प्रमोद याने रयत ॲग्रोच्या गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी उभ्या केलेल्या लढ्यामध्ये सहभाग नोंदवला होता. मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनातही तो सहभागी झाला होता. कुटुंबीयांकडून पैसे घेऊन त्याने प्रकल्पात सुमारे पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.  प्रकल्पात फसवणूक झाल्याने त्याने १८ तारखेला विषारी औषध प्राशन केले होते. त्याला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच रयतमध्ये गुंतवणूक केलेले अनेक गुंतवणूकदार, तसेच नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. गुंतवणूकदारांनी रयतप्रमुख माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com