Agricultural Electricity : कृषिपंपाच्या वीजजोडण्या मार्चअखेर पर्यंत पूर्ण करा

कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून उपलब्ध कृषी आकस्मिक निधीच्या माध्यमातून आजअखेर २ हजार ५९० वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
Agriculture Pump
Agriculture PumpAgrowon

Agriculture Electricity Nanded News : नांदेड जिल्ह्यातील कृषीपंपांच्या प्रलंबित वीज जोडण्या (Agricultural Pump Electricity) मार्च अखेर पर्यंत पूर्णत्वास न्याव्यात असे निर्देश महावितरणच्या कृषीपंप वीजजोडणी (Power Connection) धोरणाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी शुक्रवारी (ता. १०) झालेल्या बैठकीत दिले.

नांदेड जिल्ह्यातील कृषीपंपांच्या नवीन वीज जोडण्याबाबत मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी नांदेड परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यामध्ये मार्च २०२२ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या नऊ हजार ८९० कृषिपंपधारकांना येणाऱ्या मार्च अखेर पर्यंत वीजजोडण्या देण्याचे उद्दिष्ट असून, या कामांना अधिक वेग द्यावा, असेही आदेश दिले.

कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून उपलब्ध कृषी आकस्मिक निधीच्या माध्यमातून आजअखेर २ हजार ५९० वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

Agriculture Pump
'वीज जोडणी तोडणाऱ्यांचे तोंड काळे करा, आमदारांना जाब विचारा'

नांदेड जिल्ह्यासाठी निर्धारित लक्ष्य पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्येक विभागीय व उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. त्याचबरोबर थकबाकीदार कृषीपंपधारकांचे वीजबिल भरण्याबाबत समुपदेशन करून नियमित वीजबिल भरण्यासाठी प्रवृत्त करावे अशाही सूचना केल्या.

दरम्यान यापुढे कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचेही आदेश सुचित्रा गुजर यांनी यावेळी दिले.

५४ हजार वीज जोडण्या

महावितरणने गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत राज्यभरात ५४ हजार वीज जोडण्या दिल्या आहे.

हा वेग आणखी वाढवून मार्च महिन्यापर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना वीज जोडण्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महावितरणकडून यावेळी देण्यात आली. कृषीपंपाच्या वीज जोडण्या मार्चपूर्वी मिळाल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com