Agri Tourism  Agrowon
ताज्या बातम्या

Agri Tourism : कृषी पर्यटनातील संधीच्या प्रसारासाठी होणार प्रयत्न

Agriculture Tourism Business : कृषी पर्यटन क्षेत्रामधील संधीच्या प्रसार व प्रचारासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व पुणे येथील कृषी पर्यटन विकास संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला.

Team Agrowon

Akola Agriculture News : कृषी पर्यटन क्षेत्रामधील संधीच्या प्रसार व प्रचारासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व पुणे येथील कृषी पर्यटन विकास संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर कृषी पर्यटन केंद्र विकसित करून त्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे या करारानुसार प्रस्तावित आहे.

कृषी पर्यटन क्षेत्रात मोठ्या संधींचा विचार करून विद्यापीठाने कृषी पर्यटन विकास संस्थेसमवेत कृषी पर्यटन केंद्र विकसित करण्याचे ठरविले आहे. या संस्थेने महाराष्ट्रामध्ये जवळपास ६५० कृषी पर्यटन केंद्रांचे जाळे निर्माण केले आहे. तसेच कृषी पर्यटन विकासाचे विविध प्रकारची मॉडेल्स विकसित केली आहेत.

विद्यापीठाच्या कृषी पद्धती व पर्यावरण केंद्र येथे उपलब्ध जागेवर हे कृषी पर्यटन केंद्र विकसित करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. कृषी पद्धती व पर्यावरण केंद्र येथे विविध प्रकारची पिके, मृद्‍ व जलसंधारणासाठीच्या पद्धती, तसेच वनकरणीय क्षेत्र उपलब्ध असल्याने त्या क्षेत्रावर कृषी पर्यटन विकास व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे शक्य होईल.

करारावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्यासह संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, कृषी पर्यटन विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग तावरे, सदस्य अरुण क्षीरसागर, कृषी पद्धती व पर्यावरण केंद्राचे संचालक डॉ. राजेंद्र इसाळ, डॉ. नितीन कोष्टी, डॉ. अजय सदावर्ते, डॉ. जयंत देशमुख, डॉ. नितीन कोंडे, डॉ. किशोर बिडवे उपस्थित होते.

डॉ. गडाख म्हणाले, ‘‘नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, शेती पद्धतीबद्दल समाजामध्ये जागरूकता, स्वयंरोजगाराचे एक साधन तसेच कौशल्य विकासाच्या दृष्टीने प्रस्तावित कृषी पर्यटन केंद्र हे मैलाचा दगड ठरेल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Roads Issue: माजलगावच्या २०५ किलोमीटर शेतीपोच रस्त्यांची दुरवस्था

Dairy Farming Training: पशुपालन, दुग्धव्यवसाय व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी ४२ शेतकरी गुजरातला रवाना

Agricultural Land: शेतजमीनधारकांना मोठा दिलासा! शर्तभंग नियमित करण्याबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय

Water Supply Issues: तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय वेळेवर पाणीपुरवठा अशक्य : डॉ. राजेंद्र दाते पाटील

Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?

SCROLL FOR NEXT