Marathwada Water Crisis Agrowon
ताज्या बातम्या

Water Crisis : खरीप संकटाच्या निमित्ताने पाणी प्रश्‍न ऐरणीवर

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : पावसाच्या दांडीने मराठवाड्यातील पाणीसाठ्यात अपवाद वगळता वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. या स्थितीत पुन्हा एकदा मराठवाड्यातील पाणी प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पावसाची स्थिती पाहता नांदूरमध्यमेश्‍वर जलद कालवा प्रकल्पामधून सध्या उपलब्ध पाणीसाठ्यातून खरीप हंगामासाठी दोन आवर्तने देण्याचे नियोजन करावे.

तसेच जायकवाडी प्रकल्पातूनही आवर्तन देण्यात यावे, अशी शिफारस कालवा सल्लागार समितीने केली आहे. पावसाच्या उर्वरित कालावधीत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण पाहून पुढील आवर्तनांचा निर्णय घ्यावा, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. २६) कालवा सल्लागार समितीची बैठक खरीप हंगाम २०२३ साठी पार पडली.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या सिंचन भवनातील सर विश्‍वेश्‍वरय्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस आ. राजेश टोपे, आ. प्रशांत बंब तसेच मुख्य अभियंता जयंत गवळी, अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे, अधीक्षक अभियंता महेंद्र आमळे, कार्यकारी अभियंता म. सु. जोशी, कार्यकारी अभियंता जालना सु. भि. कोरडे, कार्यकारी अभियंता जायकवाडी प्रकल्प बीड रूपाली ठोंबरे, अपर जिल्हाधिकारी बीड डॉ. त्रिगुण कुलकर्णी तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

मराठवाडा विभागातील जायकवाडी व नांदूरमध्यमेश्‍वर जलद कालवा प्रकल्प या दोन प्रकल्पांतून पाटबंधारे विभागामार्फत कालव्यांद्वारे होणाऱ्या सिंचनाची माहिती देण्यात आली. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना खरिपाच्या पिकांसाठी पाण्याची आवर्तने देण्यात यावी, अशी भूमिका पालकमंत्री भुमरे, आ. बंब व आ. टोपे यांनी मांडली.

इतर धरणांतील पाणीसाठा

नांदूरमध्यमेश्‍वर प्रकल्पाचा एकूण जलसाठा ४०९.७१ दलघमी असून, त्यातील उपयुक्त जलसाठी ३८६.१० दलघमी इतका आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पात मुकणे (२१४.१६ दलघमी), भावली (४४.७५ दलघमी), भाम (७५.०१ दलघमी) आणि वाकी (७५.८ दलघमी) अशा चार धरणांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे लाभक्षेत्र अहमदनगर जिल्ह्यात १५६२ हेक्टर, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४२ हजार २९८ हेक्टर इतके आहे.

गंगापूर व वैजापूर तालुक्यांत प्रामुख्याने सिंचन लाभ दिला जातो. या प्रकल्पातून खरीप हंगामासाठी ९८.२९ दलघमी पाणी वापराची तरतूद आहे. सद्यःस्थितीत या प्रकल्पात २४६.३३ इतका अनुज्ञेय उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

जायकवाडीत ३३. ५६ टक्के पाणीसाठा

जायकवाडी प्रकल्प मराठवाड्यातील महत्त्वाचा प्रकल्प असून, त्यात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, अहमदनगर या जिल्ह्यांचे लाभ क्षेत्र आहे. या प्रकल्पाचा एकूण जलसाठा २९०९ दलघमी असून, उपयुक्त जलसाठा २१७१ दलघमी आहे. सद्यःस्थितीत २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत या प्रकल्पात एकूण उपयुक्त साठा क्षमतेच्या ३३.५६ टक्के पाणी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

जायकवाडीत उपलब्ध पाण्यात संपूर्ण वजावट करून खरीप पिकाला पाणी देण्यासाठी २०२ एम.एम क्यू. पाणी उपलब्ध आहे. यानुसार १ सप्टेंबरपासून रोटेशन सोडण्यात येणार आहे. हे रोटेशन २५ दिवस चालणार असून, जवळ जवळ १८० एम.एम.क्यू पाण्याचा वापर होणार आहे.

- राजेश टोपे, माजी मंत्री तथा आमदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : सोयाबीन, कपाशी, तूर पिकांच्या २५ टक्के अग्रिमसाठी अधिसूचना

Flower Market : शेवंती, झेंडूचा भाव वधारला

Ativrushti Madat : ऑगस्ट, सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी ७ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर;  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदतीची रक्कम

Paddy Crop Damage : परतीच्या पावसामुळे हळवी भातशेती धोक्यात

Tawarja River : तावरजा नदीवरील चार बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर

SCROLL FOR NEXT