Water crisis : खानदेशात जलसंकट ; अनेक प्रकल्पांमध्ये ठणठणाट

Khandesh rain Update : पावसाने ओढ दिल्याने खानदेशात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जळगाव, धुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पातील पाणीपातळी खालावली आहे.
Dam
DamAgrowon
Published on
Updated on

Jalgoan News : खानदेशात जलसंकट तयार होत आहे. जळगावात पारोळा, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा भागातील प्रकल्पांत ठणठणाट आहे. धुळे व शिंदखेडा (जि. धुळे) तालुक्यांतही सिंचन प्रकल्प रिकामे आहेत. त्यामुळे टंचाईचे संकेत गहिरे होत आहेत.

Dam
Water Crisis : जळगावमध्ये ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा

पारोळा तालुक्यास महत्त्वाच्या असलेल्या बोरी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा फक्त १२ टक्क्यांवर आहे. भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, पारोळा, अमळनेर भागात लघू प्रकल्प रिकामे आहेत. पाणीप्रश्‍न चिंतेची बाब बनला आहे. मन्याड, अग्नावती, बहुळा, अंजनी हे प्रकल्प पुढे भरतील की नाही, अशी स्थिती आहे.

Dam
Kharif Season : धुळे जिल्ह्यात पेरण्या रखडत; पावसाची प्रतीक्षा

बोरी धरण व पारोळा, अमळनेर तालुक्यांतील इतर लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील, अशी अपेक्षा होती. मात्र अपुऱ्या पावसामुळे पिकांची उगवण क्षमता मोठ्या प्रमाणात खुंटली आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. बोरी धरणातून १२ ते १३ गावे व पारोळा शहरास पाणीपुरवठा केला जातो. भोकरबारी, म्हसवे, शिरसमणी, पिंपळकोठा, कंकराज या प्रकल्पांतील साठाही संपत आला आहे. मागील वर्षी बोरी धरण हे १५ ऑगस्टपूर्वी तुडुंब भरून वाहत होते. मात्र आता धरणाच्या पाणीपातळी चिंताजनक आहे.

धुळ्यात सोनवद प्रकल्प रिकामाच आहे. साक्री-नंदुरबार व शिंदखेडानजीकचा बुराई प्रकल्पदेखील रिकामाच आहे. अमरावती, मालनगाव या प्रकल्पांत कुठलाही जलसाठा मागील १० दिवसांत वाढलेला नाही. नंदुरबारमधील शहादा तालुक्यातही सुसरी प्रकल्प यंदा भरलेला नाही. या प्रकल्पात मागील वर्षी मुबलक जलसाठा होता. नद्याही प्रवाही होत्या. खानदेशातील ३० गावांत पुढे टंचाई वाढू शकते. शिंदखेडा, धुळे व नंदुरबार तालुक्यांत स्थिती अधिक बिकट बनेल, अशी माहिती आहे.

बोरी प्रकल्पाची स्थिती

- पाणीपातळी ः २६३.६६० मी.

- एकूण पाणीसाठा ः १८.१११ दलघमी

- जिवंत पाणीसाठा ः २.९५१ दलघमी

- टक्केवारी ः ११.७३ टक्के

सावरखेडा लघू प्रकल्प स्थिती

- पाणीपातळी ः १०२.५४ मी.

- एकूण पाणीसाठा ः ०.३१० दलघमी

- उपयुक्त पाणीसाठा ः ०.०५७ दलघमी

- टक्केवारी ः ३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com