Irrigation Project
Irrigation Project Agrowon
ताज्या बातम्या

Irrigation Project : निधीअभावी ‘जिगाव’चे काम संथ गतीने

Team Agrowon

Agriculture Irrigation Project नांदुरा, जि. बुलडाणा ः जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी असलेल्या जिगाव प्रकल्पासाठी (Jigaon Water Project) भरीव निधी (Fund) मिळत नसल्याने कामे संथगतीने होत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात सहा व अकोल्यातील दोन तालुके मिळून सुमारे २८७ गावांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. जून २०२४ पर्यंत धरणात जलसाठा (Water Stock) निर्माण करून ४५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली (Irrigation) आणण्याचे धोरण आखण्यात आले आहे. मात्र, प्रकल्प पूर्णत्वासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

सद्यःस्थितीत प्रकल्पाचे काम सुरू असून प्रकल्पाला २०२२-२३ या वर्षात २ हजार कोटींची गरज होती. मात्र, त्यासाठी ९०० कोटीच मंजूर झाले. त्यातही आखडता हात घेत ४३० कोटीच प्रकल्पाला मिळाले. त्यातून भूसंपादनाची कामे मार्गी लागली.

उर्वरित ४७० कोटी रुपये येत्या काही दिवसात प्राप्त होणार असले तरी अजून ११०० कोटी रुपयांची खास गरज कायम आहे.

नांदुरा तालुक्यात पूर्णा नदीवर हा प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून साकारत आहे. सांडव्यासह धरणाची लांबी ८.२४ किलोमीटर असून असून उंची ३५.२५ मीटर आहे. या धरणात ७३६.५८ दशलक्ष घनमीटर जलसाठा होणार आहे.

या प्रकल्पामध्ये १५ उपसा सिंचन योजना असून बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर आणि नांदुरा या ६ तालुक्यातील २८७ गावांतील व अकोला जिल्ह्यातील बाळापूर व तेल्हारा तालुक्यांतील १९ गावे असे मिळून १ लाख १६ हजार ७७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले जाणार आहे.

या प्रकल्पात ३३ गावे पूर्णतः व १४ गावे अंशतः बाधित झाली असल्याने ४७ गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यात ९३५४ कुटुंबातील ३९ हजार ६२३ सदस्य विस्थापित होत आहे.

पहिल्या टप्प्यात २५ गावांचे पुनर्वसन केले जात असून २३ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. दुसऱ्या टप्प्यात २२ गावांचे पुनर्वसन होणार असताना मात्र, वारंवार निधीसाठी अडथळे येत आहेत. सर्व गावांचे पुनर्वसन गावठाणाची स्थळनिश्चिती झाली आहे.

या प्रकल्पावर आतापर्यंत सहा हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. सध्या प्रकल्पाची अद्ययावत किंमत १४५९७.३०० कोटी रुपये आहे. डिसेंबर २०२२ अखेर पर्यंत प्रकल्पाच्या कामावर ५९९१.८२२ कोटींचा खर्च झाला असून आता प्रकल्पाची उर्वरित किंमत ९४७७.४१८ कोटी आहे.

प्रकल्पास प्राप्त झालेल्या प्रशासकीय मान्यतेचा तपशील

मान्यता वर्ष मंजूर रक्कम

मूळ प्रकल्प मान्यता (१९९५-९६) ६९८.५० कोटी रुपये

प्रथम सुप्रमा (२००३-०४) १२२०.९८ कोटी

द्वितीय सुप्रमा(२००८-०९) ४०४४.१४ कोटी

तृतीय सुप्रमा(२०१८-१९) १३८७४.८९ कोटी

अद्ययावत किंमत १५४७९.३०० कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT