Pune News: मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भूगाव ग्रामपंचायतीचा कारभार आता डिजिटल झाला आहे. ग्रामपंचायतीने स्वतःची अधिकृत संकेतस्थळ तयार केले आहे. त्यामुळे आता नागरिकांना एका क्लिकमध्ये या गावची संपूर्ण माहिती ऑनलाइन पाहता येणार आहे..मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा महाराष्ट्र सरकारचा ग्रामविकास विभागांतर्गत सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. ग्रामपंचायतींना सक्षम करणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे हा या पाठीमागचा उद्देश आहे..Rural Development: वसा गावातील नावीन्यपूर्ण उपक्रम अभिनंदनीय.या उद्देशांना अनुसरून भूगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक एम. पी. चव्हाण आणि ग्रामविकास अधिकारी जे. एम. भोंग यांनी ग्रामपंचायतीचा सर्व कारभार डिजिटल करण्याचा निर्धार केला. त्यासाठी ग्रामपंचायतीची स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्याची संकल्पना ग्रामसभेत मांडली. ग्रामस्थांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला..अस्पायर टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला हे काम करण्याचा ठेका दिला. या कंपनीचे संचालक हनुमंत चोंधे हे गावचेच रहिवासी आहेत. त्यांनी संस्थेचे दुसरे संचालक अनिल खजिनकर यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीची संपूर्ण अद्ययावत माहिती असलेले संकेतस्थळ तयार केले. www.grampanchayatbhugaon.com असा या वेबसाइटचा पत्ता आहे..Village Development: हिवरे बाजार आदर्श गावांसाठी प्रेरणास्रोत.या संकेतस्थळाचे अनावरण गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी एम. पी. चव्हाण, जे. एम. भोंग, हनुमंत चोंधे आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते..ग्रामपंचायतीच्या गतिमान आणि पारदर्शक कारभारासाठी उपयोग व्हावा, यासाठी ही वेबसाइट तयार केली आहे. या संकेतस्थळामुळे नागरिकांची चांगली सोय होण्यास मदत होणार आहे. ऑनलाइन करभरणा करण्याबरोबरच आपल्या प्रभागातील समस्याही ऑनलाइन मांडता येणार आहे, तसेच यामुळे ग्रामपंचायतीच्या पारदर्शक कारभारातही मदत होणार आहे.एम.पी.चव्हाण, प्रशासक, भूगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.