Mumbai News: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाकडे भाजपने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. जागावाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला सन्मान देण्यात आलेला नाही. .रिपब्लिकन पक्षाकडे पूर्ण दुर्लक्ष करून रिपब्लिकन पक्षाचा अवमान व विश्वासघात करण्याची भाजपची भूमिका निषेधार्ह आहे, अशा शब्दांत भाजपवर टीका करत रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला..Municipal Elections: विदर्भातील चारही महानगरपालिकांमध्ये एकत्र लढण्याचा महायुतीचा निर्णय.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यासंदर्भातील घडामोडींवर संताप व्यक्त करताना म्हणाले, की रिपब्लिकन पक्षाने मागील १० दिवसांपूर्वीच भाजपकडे आपल्याला हव्या असणाऱ्या २६ जागांची यादी दिली होती..Maharashtra Nagarpalika Election: सर्वाधिक स्ट्राईकरेट भाजपचाच .त्यातील १५ ते १६ जागा जरी भाजपने रिपब्लिकन पक्षाला सोडल्या असत्या तरी महायुतीचा धर्म पाळल्याचे सिद्ध झाले असते..गेल्या १० दिवसांपासून जागा वाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला बोलावले नाही. आम्हाला केवळ झुलवत ठेवले. शेवटच्या क्षणापर्यंत जागा देणार, असे सांगत असताना प्रत्यक्षात रिपब्लिकन पक्षाला जागा दिल्याच नाहीत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.