Narayangaon News: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजारात सुरू केलेल्या नाफेड हमीभाव केंद्रात मागील एक महिन्यात ३५८ टन सोयाबीनची खरेदी झाली. सोयाबीन खरेदीतून १ कोटी ९० लाख ७४ हजार २४० रुपयांची उलाढाल झाली आहे. .बाजार समितीने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ९०० ते १ हजार रुपये वाढीव भाव मिळाला आहे. सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले आहेत. सोयाबीन नोंदणीला एक महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे व सचिव रूपेश कवडे यांनी दिली..Soybean Procurement: ‘पणन’च्या केंद्रांवर १ लाख क्विंटलवर सोयाबीन खरेदी .याबाबत सभापती संजय काळे म्हणाले, की खासगी व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी प्रतवारीनुसार प्रति क्विंटल ३५०० ते ४५०० रुपये या भावाने केली जात होती. सोयाबीनला हमीभाव मिळावा व सोयाबीन खरेदीसाठी बाजार समितीने नाफेड हमीभाव केंद्र सुरू करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती..शासकीय हमीभाव खरेदी योजना २०२५-२६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची परवानगी मिळताच जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नारायणगाव येथील उप बाजारात नाफेड हमीभाव केंद्र सुरू करून प्रति क्विंटल ५३०० रुपये प्रतिक्विंटल या बाजारभावाने सोयाबीनची खरेदी २९ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू केली होती..Soybean Procurement: सोयाबीनची आठ खरेदी केंद्रे वाढली.सोयाबीनला हमीभाव मिळाल्याने या योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मागील महिनाभरात नारायणगाव केंद्रात ३५८ टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. खरेदी केलेले सोयाबीन ५० किलोग्रॅमच्या गोणीत भरून वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पाठवले आहे. सोयाबीन खरेदीनंतर चौथ्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतात, असेही काळे यांनी सांगितले..खरेदी मुदतीत वाढशेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार नोंदणीसाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत खरेदी केली जाईल, असे कवडे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.