Agricultural Irrigation : भंडाऱ्यात सिंचनाकरिता ८५०० हेक्‍टरला मिळणार पाणी

सध्या या प्रकल्पात २५.२९ दलघमी साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पाचे पाणी तुमसर आणि मोहाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
Agricultural Irrigation
Agricultural Irrigation Agrowon

भंडारा ः जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांसह बावनथडी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा (Water Storage In Bawanthadi Project) आहे. परिणामी यंदा रब्बी (Rabi Season) आणि उन्हाळी हंगामासाठी ८५०० हेकटर क्षेत्राला पाणी (Agriculture Irrigation) उपलब्ध होणार असून त्यादृष्टिने पाटबंधारे विभागाने (Irrigation Deopartment) नियोजन केले आहे.

भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात भाजीपाला लागवडीखालील (Vegetable Cultivation) क्षेत्रातही वाढ नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात ६३ प्रकल्प असून या सर्व प्रकल्पांची पाणी साठवण (Water Stock) क्षमता १२१.७६ दलघमी आहे.

सद्यःस्थितीत या प्रकल्पांत ९४.३२ दलघमी उपयुक्‍त जलसाठा आहे. त्याची टक्‍केवारी ७७.४६ आहे. गेल्यावर्षी या प्रकल्पांमध्ये ६८.३६ दलघमी म्हणजे ५६.१३ टक्‍के जलसाठा होता.

यावर्षी पावसाळ्यात मुबलक पाऊस झाल्याने प्रकल्प तुडुंब भरले होते. आता या प्रकल्पांतील पाण्याचा उपयोग रबी व उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी केला जाणार आहे.

जिल्ह्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली आणि सोरमा हे चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची साठवण क्षमता ४२.८१ दलघमी आहे.

सध्या या प्रकल्पांत ३६.७८ दलघमी म्हणजे ८५.७८ टक्‍के जलसाठा आहे. तर जिल्ह्यातील ३१ लघुप्रकल्पांची साठवण क्षमता ५३.५४ दलघमी असून सध्या या प्रकल्पांत ३९.६९ दलघमी म्हणजे ७४.१२ टक्‍के जलसाठा आहे.

माजी मालगुजारी (मामा) तलावांमध्ये ७०.४५ टक्‍के जलसाठा आहे. प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी असल्याने पाटबंधारे विभागाने रबी आणि उन्हाळी पाणी देण्याचे नियोजन केले आहे.

Agricultural Irrigation
Solapur Ujani Canal : कालवा फुटीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

कालव्याच्या माध्यमातून पाणी शेतापर्यंत उपलब्ध करून दिले जाणार आहे. महत्त्वाकांक्षी आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पातून रबी व उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून ५२०० हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मध्यम प्रकल्प असलेल्या चांदपूर जलाशयातून यावर्षी २८०० हेक्‍टर सिंचन करण्याचे नियोजन आहे.

सध्या या प्रकल्पात २५.२९ दलघमी साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पाचे पाणी तुमसर आणि मोहाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

जिल्ह्यात २८ मामा तलाव असून, जनावरांची तहान भागविण्यासाठी या तलांवाचा उपयोग होतो. यावर्षी मामा तलावांमध्ये ७०.४५ टक्‍के जलसाठा आहे.

गोसे प्रकल्पात ४६ टक्‍के जलसाठा

गोसे खुर्द प्रकल्पात सध्या ४६.१५ टक्‍के जलसाठा आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता ७४७.१२ दलघमी असून सध्या या प्रकल्पात ३४१.६० दलघमी जलसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com