Dragon Fruit Agrowon
ताज्या बातम्या

Dragon Fruit Market : ड्रॅगन फ्रूटचे दर टिकून

Dragon Fruit Rate : दुसरा बहार पंधरा दिवसांत सुरु होणार; दरवाढीची शक्यता

Team Agrowon

अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Dragon Fruit : सांगली ः राज्यातील ड्रॅगन फ्रूटचा पहिला बहार संपत आला आहे. ड्रॅगन फ्रुटला राज्यासह इतर सात राज्यांत मोठी मागणी आहे. त्यामुळे दरही चांगले मिळत आहेत. ड्रॅगन फ्रुटला सध्या प्रतिकिलोस ७० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत असा दर आहे. गेल्या आठवड्यापासून ड्रॅगन फ्रुटचे दर टिकून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दुसऱ्या बहरात दर वाढण्याची शक्यता उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

राज्यात ड्रॅगन फ्रूटचे सुमारे ५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र आहे. दरवर्षी ड्रॅगन फ्रूटला मे अखेरीस फूलकळी येण्यास प्रारंभ होतो. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात ड्रॅगन फ्रूट विक्रीस येतात. मात्र, यंदाच्या हंगामाच्या सुरवातीला पाऊस लांबणीला पडल्याने हंगामाला विलंब झाला. यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात ड्रॅगन फ्रूटच्या बागा फुलल्या. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही फळे बाजारात विक्रीला आली आहेत.

वास्तविक, एका हंगामात सात वेळा फळ धारणा होते. ड्रॅगन फ्रूट सर्वसाधारण नोव्हेंबरअखेर विक्रीस असतात. यंदाचा हंगाम एक महिना उशिरा संपणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पहिला हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, बंगलोर, हैदराबाद, केरळ, तमिळनाडू यासह अन्य राज्यांतून ड्रॅगन फ्रुटला मागणी वाढली आहे.

सणांमुळे दरवाढीचा अंदाज
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात गणपती, दसरा या सणांमुळे ड्रॅगन फ्रुटला १०० ते १२० रुपये असा दर मिळाला होता. यंदाही या सणांमुळे ड्रॅगन फ्रूटच्या मागणीत वाढ होऊन दरही वाढतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

यंदा हंगाम उशिरा सुरु झाला असला तरी ड्रॅगन फ्रूटचे दर टिकून आहेत. दुसरा बहार येत्या पंधरा दिवसांत सुरु होईल. फळांना मागणी असल्याने दर वाढण्याची शक्यता आहे.
- संभाजी कोडग, ड्रॅगन फ्रूट उत्पादक,
जत, जि. सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT