Dr. Sanjaykumar Bhosale  Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Commissionerate : साखर संचालकपदाची सूत्रे डॉ. भोसलेंनी स्वीकारली

Team Agrowon

Pune News : राज्याच्या साखर आयुक्तालयातील प्रशासन विभागाच्या संचालकपदाची सूत्रे डॉ. संजयकुमार भोसले यांनी स्वीकारली आहेत.

साखर आयुक्तालयाच्या प्रशासन व अर्थविषयक कामकाजातील जाणकार अधिकारी म्हणून डॉ. भोसले ओळखले जातात.

सोलापूरच्या पंढरपूर भागातील सरकोळी गावातील शेतकरी कुटुंबात राहून १९९६ मध्ये त्यांनी जिल्हा निबंधक म्हणून सहकार विभागाच्या सेवेत प्रवेश केला. सातारा व पुण्याचे जिल्हा उपनिबंधक तसेच सुवर्ण सहकारी व रुपी सहकारी बॅंकेचे प्रशासक म्हणून त्यांनी कामकाज केले. २०१२ मध्ये त्यांना सहनिबंधकपदी बढती मिळाली होती.

साखर आयुक्तालयात यापूर्वी अर्थ व उपपदार्थ विभागाचे सहसंचालकपद सांभाळलेल्या डॉ. भोसले यांना अलीकडेच अप्पर निबंधकपदी बढती मिळाली. आयुक्तालयात प्रशासन विभागाचे संचालकपद उत्तम इंदलकर यांच्या निवृत्तीमुळे रिक्त होते.

या पदावर शासनाने डॉ. भोसले यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी पदभार स्वीकारताच राज्यातील ऊस लागवडीच्या स्थितीसाठी बैठकीचे आयोजन केले आहे.

डॉ. भोसले म्हणाले की, राज्यात यंदा उसाची लागवड चांगल्या प्रमाणात झालेली असली तरी पावसाने ओढ दिलेली आहे. त्यामुळे पुढील गाळपासाठी कमी ऊस उपलब्ध झाल्यास साखर उत्पादन मर्यादित राहू शकते. त्यामुळे साखरेचे बाजारभाव चढे राहू शकतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT