Sugar Export: भारताची साखर निर्यात कमी होत जाणार; साखरेचे भाव वाढण्याचा अंदाज

Sugar Production : जागितक बाजारात साखर निर्यातीत भारत दुसऱ्या स्थानावर असतो. पण यंदा भारताने साखर निर्यातीवर बंधन आणली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात वाढ झाली. यातच भारत सरकारने इथेनाॅल धोरण राबविण्याचा निर्णय घेतला.
Sugar
SugarAgrowon
Published on
Updated on

Sugar Rate : पुणेः जागितक बाजारात साखर निर्यातीत भारत दुसऱ्या स्थानावर असतो. पण यंदा भारताने साखर निर्यातीवर बंधन आणली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात (Sugar Rate) वाढ झाली. यातच भारत सरकारने इथेनाॅल धोरण राबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुढील  काळातही भारताची साखर निर्यात (Sugar Export) कमीच राहू शकते. पण यामुळे जागतिक बाजारात साखरेचे भाव वाढू शकतात, असा निष्कर्ष बीएमआय या संस्थेच्या अभ्यासातून पुढे आला आहे.

फिच सोल्यूशनच्या बीएमआय रिसर्चने एशिया बायोफ्यूल आऊटलूक अहवाल सादर केला. या अहवालात म्हटले आहे की, जागतिक पातळीवर साखर उत्पादनात भारताचे स्थान महत्वाचे महत्वाचे. भारताची स्वतःचीच बाजारपेठ खूप मोठी आहे. तरीही भारत साखर निर्यातीत ब्राझीलनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. पण भारताने इथेनाॅल उत्पादन आणि वापर वाढविण्याचा निर्णय घेतला.

Sugar
Sugar Export : व्यापार करारामुळे अमेरिका घेणार भारताची साखर

इंधनासोबतच गॅसोलीनमध्ये इथेनाॅल मिश्रणाचा निर्णय घेतला. इथेनाॅलचा वापर वाढवून भारत इंधन आयातीवरील खर्च कमी करणार आहे. तसेच कार्बन उत्सर्जनात घट करण्याचे भारताचे उद्दीष्ट आहे. पण या सर्व उद्दीष्ट साध्या करताना भारताच्या साखर निर्यातीवर परिणाम होऊ शकतो, असे या अहवालात म्हटले आहे.

मागील काही वर्षांपासून भारत साखर निर्यातीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. पण सरकारच्या या धोरणामुळे जागतिक साखर निर्यातीत भारताचा वाटा खूपच कमी राहू शकतो. बीएमआयच्या मते, भारतात इथेनाॅल निर्मितीची क्षमता वाढीचे काम जोरात सुरु आहे. यात इथेनाॅलची निर्मिती प्रामुख्याने उसापासून होणार आहे. देशातील जास्त कारखान्यांनी इथेनाॅल निर्मिती प्लांट्स सुरु केल्यास जास्तीत जास्त ऊस इथेनाॅल निर्मितीसाठी जाईल. त्यामुळे साखर उत्पादन कमी राहू शकते.

Sugar
Sugar Export : पुढील हंगामावरही साखर निर्यात बंदीचे सावट

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते, भारतात सध्या इंधनामध्ये इथेनाॅल मिश्रणाचे प्रमाण ११.५ टक्क्यांवर पोचले आहे. तर भारत सरकारचे उद्दीष्ट २०२५ पर्यंत २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे आहे. पण बीएमआयच्या अहवालात सरकारला २०२५ पर्यंत हे उद्दीष्ट गाठता येईल याबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. तसेच इथेनाॅल उत्पादनात वाढ झाल्यास पशुखाद्य निर्यातीतही घट होऊ शकते.

इंडोनेशियानेही इथेनाॅल मिश्रणाचे ५ टक्के उद्दीष्ट साध्य केले. आता २०३० पर्यंत १० टक्के उद्दीष्ट इंडोनेशियाने ठेवले आहे. त्यासाठी इंडोनेशियाला ऊस लागवडीत मोठी वाढ करावी लागेल. लागवड वाढली नाही तर इथेनाॅल आयात करावी लागेल. पण इंडोनेशियाचा साखर निर्यातीत फार काही वाटा नाही. त्यामुळे इंडोनेशियाची साखर निर्यात कमी झाली तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील दरावर फारसा परिणाम होणार नाही, असेही बीएमआयने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com