Agriculture Electricity
Agriculture Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : कृषिपंपांचे वीजजोड तोडू नका

टीम ॲग्रोवन

मुंबई : ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी आदेश देऊनही सुरू असलेली कृषी वीज जोड (Agriculture Electricity) तोडणी बंद करण्याचे आदेश ‘महावितरण’ने (Mahavitaran) दिले आहेत. फडणवीस यांनी चालू वीज बिल भरलेल्या आणि एका रोहित्रावरील एका शेतकऱ्याने बिल भरले तरी वीज जोड (Power Connection) बंद करण्यात येणार नाही, असे सांगितले होते. तरीही ‘महावितरण’ची वीजजोड तोडणी मोहीम जोरात होती. मात्र, हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता गृहीत धरून ‘महावितरण’ने आता वीजजोड तोडू नयेत, असे आदेश मुख्य अभियंत्यांना दिले आहेत.

दोन दिवसांपूर्वी ‘महावितरण’च्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत अध्यक्ष विजय सिंघल यांनी या बाबतच्या सूचना दिल्या होत्या. ‘वीजजोड तोडू नका. त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. हिवाळी अधिवेशन तोंडावर असल्याने ते अधिक तीव्र असतील,’’ असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला आहे. या बाबत लेखी आदेश काढले आहेत.

सध्या रब्बीचा हंगाम सुरू असल्याने शेतीला पाण्याची गरज आहे. अशात थकबाकी असल्याने वीज जोड तोडली जात आहेत. मागील दोन महिन्यांतील आकडेवारी पाहिली असता ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये महावितरणची वसुली जोरात झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ६ हजार ९२७ कोटी सहा लाखांत १५ कोटी २० लाख रुपये, तर नोव्हेंबरमध्ये ७ हजार, ९३ कोटी चार लाखांत ४०० कोटींपैकी १३४ कोटी ६३ लाख रुपयांची कृषिपंपांची वसुली केली आहे.

रब्बीचा हंगाम सुरू असल्याने विजेची गरज असताना वीजजोड तोडल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. त्याविरोधात असलेले फडणवीस ऊर्जामंत्री झाल्याने ही कारवाई का? असा सवालही केला जात आहे. त्यामुळे अधिवेशन काळात हा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता अधिक आहे.

...असे आहेत आदेश

कृषिपंप ग्राहकांचा वीजपुरवठा चालू बिल किंवा थकबाकी वसुलीकरिता तसेच इतर कोणत्याही कारणास्तव तोडण्यात येऊ नये, असा आदेश ‘महावितरण’च्या महसूल व देयक विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी काढला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने लागू करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

वर्षेनिहाय थकबाकीदार शेतकरी आणि रक्कम

१५ वर्षे ः तीन लाख दोन हजार : ५ हजार २१७ कोटी

१० ते १५ वर्षे ः ४ लाख चार हजार : ६ हजार ४१७ कोटी

५ ते १० वर्षे ः ७ लाख ६ हजार : ९ हजार ४३६ कोटी

२ ते ५ वर्षे ः ४ लाख : चार हजार २०९ कोटी

१ ते २ वर्षे ः ६ लाख २ हजार : ५ हजार ९८० कोटी

१ वर्षे ः १८ लाख चार हजार : १७ कोटी ४६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT