Agriculture Electricity : कृषिपंपांची नादुरुस्त रोहित्रे बदला, नवी वीजजोडणी द्या

राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
Agriculture Electricity
Agriculture Electricity Agrowon

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या (Agriculture Pump) नवीन वीजजोडण्या (Electricity Connection) लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोटेशनची रक्कम भरून प्रलंबित असलेल्या १ लाख ५ हजार कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या येत्या मार्च २०२३ पर्यंत देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी दिले.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : शेतीला दिवसा चार तासच वीजपुरवठा

विविध योजनांसह क्षेत्रीय कार्यालयांना निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्यात कोणतीही अडचण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. कृषिपंपांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी सज्ज राहावे. तसेच नादुरुस्त व जळालेले कृषी रोहित्र बदलण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी या वेळी दिले.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : कृषिपंपासाठी आठ तास वीज द्या

पुणे येथील ‘प्रकाशभवन’मध्ये बुधवारी (दि. ७) आयोजित बैठकीत पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कृषिपंपांच्या कामाचा श्री. ताकसांडे यांनी आढावा घेतला. बैठकीला प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य अभियंता सर्वश्री राजेंद्र पवार (पुणे), सुनील पावडे (बारामती), परेश भागवत (कोल्हापूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : एक लाख कृषिपंपांना वीजजोडणी देणार

संचालक ताकसांडे म्हणाले, की पैसे भरून प्रलंबित असलेल्या एकूण १ लाख ८० हजार १०६ कृषिपंपांना येत्या मार्च २०२३ पर्यंत नवीन वीजजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी गेल्या नोव्हेंबरपर्यंत ७४ हजार ८८१ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

तर उर्वरित १ लाख ५ हजार २२५ वीजजोडण्या येत्या मार्चपर्यंत देण्याचे नियोजन आहे. मागील नोव्हेंबर महिन्यात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक २० हजार २५० कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तर या महिन्यापासून मार्च २०२३ पर्यंत दरमहा ३० हजारांपेक्षा अधिक वीजजोडण्या देण्याचे आहे.

कार्यालय, कंत्राटदार एजन्सीच्या कामावर लक्ष ः ताकसांडे

कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या देण्याची तातडीने कार्यवाही करावी. यामध्ये हयगय खपवून घेणार नाही. वीजजोडण्या देण्याच्या क्षेत्रीय कार्यालय व कंत्राटदार एजन्सीच्या कामावर मुख्यालयाकडून दैनंदिन लक्ष ठेवण्यात येत आहे, असे ताकसांडे यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com