Agriculture Electricity : एक लाख कृषिपंपांना वीजजोडणी देणार

पैसे भरून प्रलंबित असलेल्या राज्यातील एक लाख कृषिपंपांना डिसेंबर २०२२ पर्यंत वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यानुसार प्राधान्याने प्रयत्न झाले पाहिजे, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांनी दिले.
Agriculture Electricity
Agriculture ElectricityAgrowon
Published on
Updated on

अमरावती : पैसे भरून प्रलंबित असलेल्या राज्यातील एक लाख कृषिपंपांना (Agriculture Pump) डिसेंबर २०२२ पर्यंत वीजजोडणी (Electricity Connection) देण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यानुसार प्राधान्याने प्रयत्न झाले पाहिजे, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांनी दिले. तसेच सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी देखील थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

Agriculture Electricity
Agricultural Electricity : कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करा

येथील प्रकाशसरिता सभागृहात आयोजित अमरावती परिमंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, उप महाव्यवस्थापक (मातं) प्रमोद खुळे, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे (अमरावती), सुरेश मडावी (यवतमाळ), दीपक देवहाते, हरीश गजबे, वाय. डी. मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

Agriculture Electricity
Electricity Pokhara Project : पोखरा प्रकल्पातील गावांना २४ तास वीजपुरवठा द्या

या वेळी संजय ताकसांडे यांनी अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ० ते ३० मीटर अंतर पैसे भरून असलेल्या ७१ कृषिपंपांना वीजजोडण्या देण्याच्या सूचना केल्यात. उपलब्ध असलेल्या अनुक्रमे १६ आणि ११ कोटींच्या आकस्मिक निधीच्या कामाचे शंभर टक्के आदेश काढून ३१ ते २०० मीटर अंतर असलेल्या वीजजोडणी देणे, तसेच कृषी आकस्मिक निधी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, त्याचबरोबर २०१ ते ६०० मीटर अंतरापर्यंत असलेल्या वीजजोडणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यादृष्टीने वीजजोडणीच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्यात.

ग्राहकांना वीजपुरवठा करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. त्यामुळे वीज यंत्रणांची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी. वितरण हानी जास्त असलेल्या परिमंडळातील १३ वाहिन्यांवर विशेष लक्ष देऊन त्या वाहिन्यांची वितरण हानी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच सध्याच्या स्थितीत वीज मीटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच पुढील काळात आवश्यकतेनुसार मीटर उपलब्ध होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com