Nanded News शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामात (Kharif Season) लागवडीसाठी अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे (HTBT Cotton Seed) खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
बाजारात बोगस कंपन्या खासगी व्यक्तीमार्फत परवाना नसलेल्या अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे.
या अवैध बियाणांना शासनाची मान्यता नाही. अशा प्रकारचे बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. या प्रकारचे लागवड केलेल्या कापूस पिकांचे पाने व कापसाचे नमुने तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. यात एचटीबीटी आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच एखाद्या व्यक्तीकडे अनधिकृत एचडीबीटी बियाणे आढळल्यास त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल होवू शकतो. याबाबत कृषी विभाग व पोलिस विभाग सतर्क असून, एचटीबीटी बियाणे विक्री करणाऱ्यावर लक्ष ठेवून असल्यामुळे कोणीही हे बियाणे विक्रीच्या प्रयत्न करू नये.
या प्रकारचे अनधिकृत बियाणे विक्रीसाठी बोगस कंपन्या, खासगी एजंट, खासगी व्यक्ती प्रलोभन दाखवतील त्यास बळी पडू नका, आपली फसवणूक होऊ शकते, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘तणनाशकांच्या वापरामुळे आजार होऊ शकतात’
एचटीबीटी बियाणे लागवडीनंतर तणनाशक फवारण्याची शिफारस करतील. दरम्यान, ग्लायफोसेट हे तणनाशक कार्सिनोजनीक गुणधर्माचे असून, त्याच्या वापरामुळे मानवी आरोग्यास कॅन्सरसारखे रोग उद्भवण्याची शक्यता आहे.
त्याच्या अतिवापरामुळे जमिनीची उपयोगिता नष्ट होऊन भविष्यात त्या जमिनीत कोणतेही पीक लागवड करता येणार नाही.
ग्लायफोसेट या तणनाशकाच्या केवळ पिके नसलेल्या जमिनीवर, चहा मळ्यासाठी वापर करण्याची शिफारस केंद्र सरकारने केली आहे. अशा प्रकारचे बनावट बियाणे खरेदी टाळून अधिकृत विक्रेत्याकडून महाराष्ट्र राज्यात परवानगी असलेले अधिसूचित कपाशी बियाणेच खरेदी करावे.
एचटीबीटी बियाणांच्या विक्रीबाबत बनावट कंपन्या, खाजगी एजंट प्रलोभन देत असतील तर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी यांना माहिती द्यावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.