Maize Seed : घरचे बियाणे वापरावर आदिवासी शेतकऱ्यांचा भर

मेळघाटातील बहुतांश गावांमध्ये बियाण्यांसाठी हाच पॅटर्न राबविला जातो. यातूनच पैशाची देखील मोठी बचत होते.
Maize
MaizeAgrowon

Amravati News : शेतीवरील उत्पादकता खर्च कमी असावा याकरिता हंगामाच्या सुरुवातीपासूनच दुर्गम मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांद्वारे (Tribal Farmer) भर दिला जातो. शेतकऱ्यांनी मका लागवडीकरिता (Maize Cultivation) घरचेच बियाणे उपलब्ध व्हावे याकरिता साठवणुकीवर भर दिला आहे.

नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची मका लागवडीला वाढती पसंती आहे. त्यामुळेच ऐन पेरणीच्या वेळेला मका बियाण्याचे दर गगनाला भिडतात असा अनुभव आहे. ५ किलो बियाण्यांच्या पिशवीसाठी तब्बल १५०० रुपये मोजावे लागतात.

प्रति किलो ३०० रुपये असा दर मका बियाण्यांचा राहतो. बाजारावरील अवलंबिता कमी असावी असा मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांचा प्रयत्न राहतो. याच प्रयत्नांतून त्यांनी हंगामात लागणारे मका बियाणे विकत न आणता त्याची साठवणूक व वापरावर भर दिला आहे.

Maize
Agrowon Podcast : रब्बीतील मका आवक हळूहळू वाढतेय

मेळघाटातील बहुतांश गावांमध्ये बियाण्यांसाठी हाच पॅटर्न राबविला जातो. यातूनच पैशाची देखील मोठी बचत होते. कमी खर्चात व नगदी पीक म्हणून मेळघाटात मक्‍याला पसंती आहे. वर्षातून तीन वेळा हे पीक घेतले जाते.

त्याकरिता लागणारे बियाणे घरीच तयार करण्यावर भर आहे. त्याकरिता चांगल्या प्रतीच्या मका कणसांची निवड होते. ही निवडलेली कणसे नंतर गोठ्यात किंवा उंच ठिकाणी ऊन वारा मिळेल अशा जागेवर बांधून ठेवतात.

जेणेकरून त्यावर किडरोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. अशाप्रकारे साठवून ठेवलेल्या कणसातील बियाणे काढून त्याची लागवड केली जाते.

उंच लाकडाला मक्‍याची कणसे बांधल्यामुळे त्याला चांगला सूर्यप्रकाश मिळतो व कीड लागत नाही. पेरणीच्या वेळी चांगल्या प्रतीचे बियाणे मिळते व उगवणक्षमता पण चांगली असते.
नारायण दलाले, शेतकरी, जामली, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com