CMV  Agrowon
ताज्या बातम्या

CMV : ‘सीएमव्ही’ ने नुकसानग्रस्तांना थेट अनुदान किंवा मदतनिधी द्या

खानदेशातील शेतकऱ्यांची मागणी; साडेचार हजार हेक्टरला फटका

टीम ॲग्रोवन

जळगाव ः खानदेशात लहान केळी बागांचे कुकुंबर मोझॅक विषाणूने (सीएमव्ही) (CMV Virus) अतोनात नुकसान झाले आहे. तब्बल साडेचार ते पाच हजार हेक्टरवरील केळी बागा काढून फेकाव्या लागल्या असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Crop Damage) रोपांचा निम्मे अनुदानावर पुरवठा करण्याऐवजी थेट अनुदान किंवा मदतनिधी द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सीएमव्हीने जळगावमधील रावेर, यावल, जामनेर, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील शहादा भागात केळी बागांचे मोठे नुकसान झाले. जुलै व ऑगस्टमध्ये लागवडीच्या केळी बागांची अधिकची हानी झाली. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, यासंबंधी नाशिक स्थित केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संस्थेच्या तीन शास्त्रज्ञांनी पाहणी केली.

जळगाव येथील केळी संशोधन केंद्रानेही पाहणी करून आपला अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठास सादर केला. यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे पंचनामे करून त्यांना थेट अनुदान किंवा मदतनिधी मिळणे अपेक्षित होते. परंतु शासनाने नुकसानग्रस्तांना केळीच्या पुनर्लागवडीसाठी निम्मे अनुदानावर रोपे देण्याचे जाहीर केले आहे.

केळीचे एक रोप १४ ते १५ रुपयात मिळते. याचा अर्थ एका रोपांसाठी सात ते साडेसात रुपये अनुदान शासन देईल. परंतु या काळात किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये रावेर, यावल, मुक्ताईनगर, शहादा भागात केळी लागवड फारशी केली जात नाही. ज्या बागांत पुनर्लागवड करायची होती, ती शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त रोपे काढून लागलीच सप्टेंबरमध्येच केली.

यामुळे सध्या केळी रोपांची शेतकऱ्यांना गरज नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती शासनाने संकलित करून त्यांना पुढे थेट अनुदान द्यावे. पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शासन ‘सीएमव्ही’ने नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना अनुदान देणार आहे. त्याचे पंचनामे करण्याचे आदेशही दिले आहेत. प्रत्येक नुकसाग्रस्ताची माहिती संकलित केली जाईल. शेतकरी या अनुदानाचा उपयोग केळी लागवड किंवा शेतीसाठी आपल्या नियोजनानुसार करू शकतील. नव्याने केळी लागवडीसाठीच हे अनुदान दिले जाईल, असे नाही.

- खासदार उन्मेष पाटील, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT