Banana CMV : ‘सीएमव्ही’ मुळे केळीवर फिरविला रोटावेटर

केळी उत्पादक शेतकऱ्याने केळी पिकावर कुकुंबर मोझॅक विषाणूंचा (सीएमव्ही) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने केळी पिकावर रोटाव्हेटर फिरविला आहे.
Banana CMV
Banana CMVAgrowon

नंदुरबार : मध्य प्रदेश (Madhy Pradesh) सीमेलगत असलेल्या खेडदिगर (ता. शहादा) येथील केळी उत्पादक शेतकऱ्याने केळी पिकावर (Banana Crop) कुकुंबर मोझॅक विषाणूंचा (Mozak Virus) (सीएमव्ही) (CMV) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने केळी पिकावर रोटाव्हेटर फिरविला आहे.

Banana CMV
Crop Damage : नुकसानग्रस्तांना पीकविम्याचा लाभ द्या,

आपल्या पाच एकर शेतातील केळींच्या झाडांवर ट्रॅक्टरने रोटावेटर फिरवून उद्ध्वस्त करण्याची वेळ त्यांच्यावर आली. सीएमव्हीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Banana CMV
Crop Damage : अतिवृष्टिने पिकांचे मोठे नुकसान तरीही नजर अंदाज पैसेवारी ५८ पैसे

शहादा तालुक्यातील शेतकरी केळी लागवडीकडे वळला आहे. शेकडो एकरांत लागवड केली आहे. त्यात ब्राह्मणपुरी, सुलवाडे, खेडदिगर, कुढावद परिसर केळीचे आगार म्हणून ओळखले जाते. रोप केळीचे रोप तसेच खोडे

Banana CMV
Tur Crop Management : तुर पिकाच्या चांगल्या वाढीसाठी कोणते उपाय कराल?| Agrowon | ॲग्रोवन

लागवडीपासून तर कमळ फुलेपर्यंत प्रतिरोप मोठ्या प्रमाणावर खर्च शेतकरी करतात त्यातच वाढते मजुरी, खते, कीटकनाशके यांचे दर गगनाला भिडल्याने पीक परवडेनासे झाले आहे. मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही उत्पादित केळीला केळीला भाव नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com