Agrowon Exhibition
Agrowon Exhibition  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Exhibition : कृषी विद्यापीठाच्या दालनावर तंत्रज्ञानाचा प्रसार

Team Agrowon

औरंगाबाद ः ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनामध्ये (Agrowon Agriculture Exhibition) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्र आणि राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाची दालने आहेत.

विद्यापीठांनी विकसित केलेली विविध पिके, फळपिकांचे वाण (Crop Verity), लागवड, कीड-रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा (Agriculture Technology) प्रसार केला जात आहे. विद्यापीठनिर्मित विविध निविष्ठा तसेच शेतीपूरक व्यवसायाबद्दल माहिती दिली जात आहे.

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. दिलीप हिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना यंदाच्या आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त बाजरी, राळे, भगर, नाचणी आदी तृणधान्यांची माहिती दिली जात आहे.

या ठिकाणी विद्यापीठाने विकसित केलेले बाजरीचे विविध वाण उपलब्ध आहेत. कृषी विज्ञान केंद्राचे सन्वयक डॉ. किशोर झाडे

यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी हवामान विषयविशेषज्ञ डॉ. अशोक निर्वळ, शिवाजी काजळे शेतकऱ्यांना मेघदूत तसेच दामिनी अॅप, शेतीपूरक कुक्कुटपालन याबाबत माहिती देत आहेत.

या दालनामध्ये विद्यापीठातर्फे निर्मित पेरू, केसर आंबा, जांभूळ, चिंच आदी फळपिके, बायोमिक्स, जैविक खते, मिरची पावडर, हळद पावडर, ग्रामप्रिया जातीची कोंबडी, अंडी आदी घटकांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

SCROLL FOR NEXT