Agrowon Exhibition 2023 : नवतंत्रज्ञानाच्या आविष्काराने शेतकऱ्यांमध्ये उमेद

‘सकाळ-अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाला राज्यभरातील शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद
Agrowon Exhibition 2023
Agrowon Exhibition 2023Agrowon

टीम अॅग्रोवन
औरंगाबाद ः ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या वतीने औरंगाबादमध्ये भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला (Agrowon Exhibition 2023) राज्यभरातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.१३) पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद दिला.

शेतीतले नवनवीन तंत्रज्ञान (New Technology), कीड-रोगांवरील उपाय, शेतीपूरक आणि प्रक्रिया उद्योगासह यांत्रिकीकरणाची विविध दालने शेतकऱ्यांचे विशेष आकर्षण राहिले.

प्रदर्शनातील दालनांतून मिळालेल्या माहितीमुळे शेतकऱ्यांमध्ये एक नवी उमेद निर्माण झाली. त्याबाबत शेतकरी भरभरून बोललेच, पण काही अपेक्षाही व्यक्त केल्या.

Agrowon Exhibition 2023
Agrowon Agriculture Exhibition : ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनात ज्ञानाचा जागर

‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यास मदत होते आहे. यंदाच्या कृषी प्रदर्शनात विविध पिकांवरील कीड व्यवस्थापनासाठी उपयुक्त सौरकामगंध सापळ्याबाबत माहिती मिळाली. सूक्ष्म सिंचनाच्या नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती मिळाली. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात भेट देऊन पाहणी करावी. त्यामुळे निश्चितच ज्ञानात भर पडेल.
- श्रीकृष्ण नकाते, उपळाई, ता. माढा, जि. सोलापूर.

Agrowon Exhibition 2023
Krushik Exhibition 2023 : ऑक्सफर्ड’ची ज्ञानगंगा मऱ्हाटी अंगणी

शेतीमध्ये येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढणार आहे. ड्रोन तंत्रज्ञान विविध ट्रॅक्टरचलित अवजारांची प्रक्रिया उद्योगांची माहिती मिळाली. शेतकऱ्यांना बाजारपेठेचे ज्ञान आवश्यक आहे. ‘अॅग्रोवन’च्या आगामी कृषी प्रदर्शनात वायदे बाजारातील शेतीमालाचे व्यवहार यावर चर्चासत्र आयोजित करावे.
- प्रकाश हरकाळ, आर्वी, जि. परभणी.

पिकांसाठी उपयुक्त विविध जैविक खते, पिकांचे, फळांचे विविध वाण तसेच स्वयंचलित ठिबक यंत्रणा याबाबतची माहिती ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनातून मिळाली. शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचविण्यासाठी या प्रदर्शनाचे नेटके आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी.
- लक्ष्मण पांचाळ, धर्मापुरी, जि. परभणी.

Agrowon Exhibition 2023
Agrowon Agri Exhibition : ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी

अॅग्रोवन कृषी प्रदर्शनातून ज्ञानाचा जागर सुरु आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सुरु केलेला प्रक्रिया उद्योग, महिला बचत गटांची विविध उत्पादनांची दालने लक्षवेधी आहेत.

त्यामुळे शेतकरी गटांमार्फत प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी प्रेरणा मिळाली.
- बालासाहेब हिंगे, कोथाळा, ता. मानवत, जि. परभणी

पिकांच्या उत्पादन वाढीमध्ये मधमाश्यांची भूमिका महत्त्वाची आहे. ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात मधमाशी संवर्धनाबाबत सविस्तर माहिती मिळाली.

कृषीविषयक ज्ञानाने संपन्न होण्यासाठी शेतकऱ्यांनी हे कृषी प्रदर्शन पाहणे आवश्यक आहे.
- ज्ञानेश्वर शेंद्रे, साष्ट पिंपळगाव, ता. अंबड, जि. जालना

माझी जमीन पलभरी येथे आहे. शेतीबाबत अॅग्रोवन नियमितपणे माहितीचे आदानप्रदान वर्षानुवर्षे करीत आहे.

मी नियमित वाचक आहे. औरंगाबादमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आल्याची माहिती वाचून या ठिकाणी आलो. अनेक प्रकारची नवनवीन माहिती मिळाली.

शेतीतली नवनवीन यंत्रे, विविध पिकांची माहिती येथे मिळाली. सर्वांनी आवर्जून बघावे असे हे प्रदर्शन आहे.
- जगन्नाथ वाघ, सातारा परिसर, औरंगाबाद
-----------------
प्रदर्शन खूप छान आहे. शेतीविषयक माहिती, विविध यंत्रे या ठिकाणी ठेवलेली आहेत. महिलांसाठीची दालनेही विशेष वाटली.

मसाले, रोप, फळांची माहिती मिळाली. हे प्रदर्शन शेती करणाऱ्यांसाठी, करू इच्छिणाऱ्यांसाठी दिशादर्शक ठरावे असे आहे.
- नंदा सस्ते, गजानन महाराज मंदिर, औरंगाबाद

‘अॅग्रोवन’चे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी माहितीची पर्वणी ठरले आहे. आधुनिक शेतीला हवी असलेली सर्व प्रकारची माहिती या प्रदर्शनात मिळते.

लहान-मोठ्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी माहितीची विविध दालने आहेत. सर्वांनी हे बघावे, असे प्रदर्शन आहे.
- प्रवीण देवरे, एन ७, औरंगाबाद
-----------------------------
आपण शेती करतो त्यात नवे प्रयोग करण्यासाठी प्रेरणा मिळते.
आपण जो व्यवसाय करतो, त्या क्षेत्रात नवे काय सुरू आहे, याचा कानोसा घेता येतो.

जनावरांच्या आहारापासून ते शेतीतील तंत्रज्ञानापर्यंत सर्व गोष्टी या प्रदर्शनात पाहायला मिळाल्या.
- गजानन सोळंकी, मेराबुद्रक, ता. चिखली, जि. बुलडाणा.


मी ‘ॲग्रोवन’चे शेतीप्रदर्शन पाहण्यास आवर्जून येत असतो. शेतीविषयक नवी माहिती यातून मिळते. पिकांसाठी आवश्यक माहिती या प्रदर्शनातून मिळाली.

शेतीचे तंत्रज्ञान आणि त्यातील प्रयोग आम्हाला मिळाले.
- गजानन काझी, देवपूर, ता. कन्नड, जि.औरंगाबाद
----------------------
हे प्रदर्शन शेती उद्योगाची संपूर्ण माहिती देणारे ठरत आहे. कीटकनाशक, तणनाशकांबाबत योग्य मार्गदर्शन आम्हाला मिळाले.

कडधान्य उत्पादनांची माहिती घेतली. आम्हाला जी माहिती हवी आहे, ती मिळत असल्याने आम्ही ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन पाहतोच.
- गणेश खटके, आडगाव बु., औरंगाबाद.


शेतीतील नवे तंत्रज्ञान पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत. फळबागांचे कसे नियोजन करायचे, याची माहिती घेतली.

सिंचनासाठी नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. ट्रॅक्टर, कडबा कुट्टी मशिन पाहिल्या. मशागतीचे श्रम कमी करणारी यंत्रेही या प्रदर्शनात पाहायला मिळाली.
- पप्पू मुख्यदल, जुमडा, ता. देऊळगाव, जि. बुलडाणा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com