Satara Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Pulses Sowing : कडधान्ये, तृणधान्यांच्या पेऱ्यातील घट यंदाही कायम

Kharif Sowing : यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती सोयाबीनलाच आहे.

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती सोयाबीनलाच आहे. शुक्रवार (ता. २८)पर्यंत या दोन जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ७२६ हेक्टरवर सोयाबीन पेरा झाला आहे. तूर, मूग, उडीद ही कडधान्ये तसेच ज्वारी, बाजरी, मका या तृणधान्यांतील यंदाही घट कायम आहे.

या दोन जिल्ह्यांत कडधान्यांची १ लाख ४१ हजार ३६८ पैकी ८२ हजार २२४ हेक्टरवर, तर तृणधान्यांची १६ हजार ५७६ पैकी ७ हजार २११ हेक्टरवर पेरणी झाली.

परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. २८)पर्यंत एकूण ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी ४ लाख ६१ हजार ३११ हेक्टरवर (८६.२४ टक्के) पेरणी झाली सोयाबीनची २ लाख ४९ हजार ७२७ पैकी २ लाख ४५ हजार १७७ हेक्टरवर (९८.१८ टक्के), तुरीची २९ हजार ९७० हेक्टर (६५.२१ टक्के), मुगाची ७ हजार ५६२ हेक्टर (२७.८२ टक्के), उडदाची १ हजार ५०७ हेक्टर (१६.६० टक्के) पेरणी झाली. ज्वारीची २ हजार १२० हेक्टर (२८.९१ टक्के), बाजरीची ४२० हेक्टर (३५.९७ टक्के), मक्याची ५२९ हेक्टर (५२.६९ टक्के) पेरणी झाली.

कपाशीची १ लाख ९२ हजार २१३ पैकी १ लाख ७३ हजार ७०२ हेक्टरवर (९०.३७ टक्के) झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५४ पैकी ३ लाख २८ हजार ९६८ हेक्टरवर (९२.५२ टक्के) त्यात सोयाबीनची २ लाख ५६ हजार ४०४ पैकी २ लाख ४९ हजार ५४९ हेक्टर (९७.३३ टक्के) पेरणी झाली.

तुरीची ३५ हजार १६ हेक्टर (७७.२९ टक्के), मुगाची ४ हजार ३३७ हेक्टर (५५.७३ टक्के), उडदाची ३ हजार ६१२ हेक्टर (६१.४४ टक्के), ज्वारीची ३ हजार २१४ हेक्टर (५८.३८ टक्के), बाजरीची ११२ हेक्टरवर मक्याची ५७२ हेक्टर पेरणी झाली. कपाशीची ३८ हजार ८२१ पैकी ३१ हजार ७९४ हेक्टर (८१.९० टक्के) लागवड झाली.=

परभणी हिंगोली कडधान्ये पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका तूर मूग उडीद

परभणी ६५१५ २०७५ १६०

जिंतूर ५४२० ५३५ १७६

सेलू २०५८ ६८९ १५८

मानवत १९६५ ७३० २०४

पाथरी ३२३४ ७९५ १७४

सोनपेठ १६९९ २५१ ८९

गंगाखेड ४४७५ ११०० १७५

पालम २९८० ९५६ २४५

पूर्णा १६२५ ४३१ १२६

हिंगोली ९१४४ ४४८ ५०२

कळमनुरी ७१५ २१० १९५

वसमत ३३८८ ९५१ ६५१

औंढा नागनाथ ६५५० २१५० १४५०

सेनगाव १५२१९ ५७८ ८१४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT