Jute Sowing : खानदेशात ताग पेरणी वाढणार

Jute Farming : खानदेशात सुरवातीपासून पाऊस समाधानकारक नाही. पाऊस उशिरा आल्याने सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारीची पेरणी अनेक शेतकरी करू शकले नाहीत. या स्थितीत ताग पेरणी वाढणार असल्याची स्थिती आहे.
Jute Sowing
Jute SowingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात सुरवातीपासून पाऊस समाधानकारक नाही. पाऊस उशिरा आल्याने सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारीची पेरणी अनेक शेतकरी करू शकले नाहीत. या स्थितीत ताग पेरणी वाढणार असल्याची स्थिती आहे.

तागाचे क्षेत्र खानदेशात पूर्वी स्थिर असायचे. ते चार ते पाच हजार हेक्टरवर अनेकदा पोहोचले. परंतु ताग पिकात हवे तसे वाण नसल्याने आणि पणन व्यवस्था बिघडल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळले.

पण ताग पीक उशिरा पेरणीसाठी उत्तम आणि अनेकदा कमी पावसात येणारे पीक आहे. यंदा ३०० ते ४०० हेक्टरवर एकट्या जळगाव जिल्ह्यात तागाची पेरणी होऊ शकते. यंदा पाऊस लांबल्याने शेतकरी ताग पेरणीला पसंती देत आहेत. यंदा सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरवर खानदेशात तागाची पेरणी होईल, अशी स्थिती आहे. तापी, गिरणा, अनेर, पांझरा नदीच्या लाभक्षेत्रात ही पेरणी होईल.

Jute Sowing
ताग मिल बंद का पडत आहेत?

काळ्या कसदार जमिनीत अनेक शेतकरी ताग पेरणी करतात. सध्या तागाची पेरणी अनेक शेतकऱ्यांनी उरकली आहे. पेरणीला गती आलेली नसली तरी पुढील आठवड्यात पेरणी वेगात सुरू होईल. अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी पेरणी सुरू करतील. बाजारात तागाचे बियाणे मुबलक प्रमाणात आहे.

Jute Sowing
Jute Crop : ताग पीक जोमात

तसेच शासकीय संस्थांकडूनही माफक दरात ताग बियाणे दिले जात आहे. राज्य शासनाच्या महाबीज संस्थेने ताग पिकाची प्रात्यक्षिके घेतली आहेत. त्यासाठी नियोजन केले आहे. यामुळे यंदा ताग पिकाचे क्षेत्र बऱ्यापैकी राहील, अशी माहिती आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी पूर्वमशागत केली आहे.

तागाची पेरणी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, जळगाव, जामनेर भागात होईल. तसेच धुळ्यात शिरपूर, नंदुरबारात शहादा भागात पेरणी होऊ शकते. अनेकांनी बियाण्यासाठी कृषी केंद्रांकडे चौकशी सुरू केली आहे. पेरणी पुढील आठवड्यात होईल, असे संकेत सध्या आहेत. सध्या पाऊस सुरूच आहे. यामुळे पेरणीला अडचण आहे.

पावसाची रोज हजेरी

खानदेशात मागील पाच दिवसांपासून सतत पाऊस येत आहे. मागील तीन दिवस सकाळी किंवा दुपारी तुरळक पाऊस येतो व सायंकाळनंतर चांगला पाऊस येत आहे. यामुळे वाफसास्थिती तयार होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मंगळवारी (ता. २५) दिवसभरात काही वेळ तुरळक पाऊस झाला. नंतर सायंकाळपर्यंत पाऊस नव्हता. परंतु सातनंतर पुन्हा पाऊस आला. पश्‍चिम भागात पाऊस मध्यम व हलका असल्याने प्रकल्प भरण्यास अनुकूल स्थिती नाही. गिरणासह इतर प्रकल्पांचा जलसाठा स्थिर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com