Capsicum Seedling Agrowon
ताज्या बातम्या

Capsicum Seedling : ढोबळी, लांब मिरचीच्या रोपांच्या मागणीत घट

Capsicum cultivation : गेल्या वर्षभरापासून ढोबळी मिरची आणि लांब मिरची या पिकावर खोड कीड आणि थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात या दोन्ही पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

Team Agrowon

Sangli News : गेल्या वर्षभरापासून ढोबळी मिरची आणि लांब मिरची या पिकावर खोड कीड (Capsicum Pest) आणि थ्रिप्स या रोगाचा (Capsicum Disease) प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात या दोन्ही पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

यामुळे ढोबळी मिरची, लांब मिरचीच्या रोपांच्या (Capsicum Seedling) मागणीत सुमारे २० टक्क्यांनी घट झाली आहे. या पिकाऐवजी काकडी आणि टोमॅटो पिकाकडे शेतकरी वळला आहे.

जिल्ह्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो. यंदा उन्हाळा वाढला असला तरी, भाजीपाला पिकास पुरेसे पाणी असल्याने शेतकऱ्यांनी लागवड करण्यास पुढाकार घेतला आहे. ढोबळी मिरची, दोडका, काकडी, टोमॅटो, वांगी या पिकांसह अन्य भाजीपाला देखील शेतकरी लागवड करतात. उन्हाळ्यात काटेकोर नियोजन केले जाते.

उन्हाळ्यात बाजारपेठेत भाजीपाल्या आवक कमी अधिक होत असल्याने दरही चांगले मिळतात. त्यामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीसाठी प्राधान्य देतात. गेल्या वर्षापासून ढोबळी मिरची आणि लांब मिरचीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होत आहे.

यामुळे गेल्या वर्षभरापासून या दोन्ही पिकांच्या रोपांच्या मागणीत २० टक्क्यांनी घट झाली असल्याचे रोपवाटिका मालकांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या दोन्ही पिकांच्या रोपांच्या मागणीत घट झाली असली तरी, काकडी, टोमॅटोसह अन्य भाजीपाल्याच्या रोपांच्या मागणीत वाढ झाली आहे.

ढोबळी मिरची आणि लांब मिरची यावर रोगाच्या प्रादुर्भावामुळे रोपांची मागणी कमी आहे. परंतु इतर पिकांच्या रोपांच्या मागणीत वाढ झाली आहे.
- प्रकाश कदम, प्रविराम कृषी परिवार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभऱ्याचे भाव कमीच; मक्याचा भाव दबावातच, सोयाबीन भाव स्थिर, कापूस तसेच मिरचीचे दर टिकून

Agriculture Loan: कर्जमुक्‍त शेतकऱ्यांना तत्काळ कर्जाची उपलब्धता करा

Agriculture Fraud: वेचणी बॅग व्यवहारात आठ कोटींची फसवणूक

Agriculture Fraud: कृषी अधिकाऱ्यांची चौकशी करणार ‘यशदा’चे महासंचालक

Krushi Samruddhi Scheme : कृषी समृद्धी योजनेंतर्गत ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र आणि बीबीएफ यंत्रासाठी मिळणार अनुदान; शासन निर्णय जारी

SCROLL FOR NEXT