Vegetable Nursery : भाजीपाला रोपवाटिकांचे अर्थकारण बिघडले

राज्यभरात भाजीपाल्याला दर नसल्याने नव्या लागवडी रखडल्या आहेत. गेल्या वर्षातील या कालावधीच्या तुलनेत ५० टक्के ही मागणी नसल्याने रोपवाटिका चालक हतबल झाले आहेत.
Vegetable Nursery | Vegetable Rate
Vegetable Nursery | Vegetable RateAgrowon

कोल्हापूर : राज्यभरात भाजीपाल्याला (Vegetable Rate) दर नसल्याने नव्या लागवडी रखडल्या आहेत. गेल्या वर्षातील या कालावधीच्या तुलनेत ५० टक्के ही मागणी नसल्याने रोपवाटिका (Nursery) चालक हतबल झाले आहेत. रोपांची मागणीच थांबल्याने रोपवाटिकांचे अर्थकारणही धोक्यात आले आहे. तयार झालेल्या रोपांना मागणी नसल्याने दररोज हजारो रुपयांची रोपे खराब होत असल्याची स्थिती आहे.

Vegetable Nursery | Vegetable Rate
Nursery License : रोपवाटिकांना आता तीन वर्षांचा परवाना

साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये राज्यात सर्वाधिक भाजीपाल्याची लागवड केली जाते. या हंगामात बहुतांश भाजीपाल्याच्या रोपांना जोरदार मागणी असते. पण यंदा मागणीत घट दिसून येत आहे. ऑक्टोबरमध्ये राज्याच्या सर्वच भागांत तुफान पाऊस झाला. याचा मोठा फटका भाजीपाल्याला बसला. राज्यातील बहुतांश भाजीपाला पट्ट्यात कोट्यवधी रुपयांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले.

Vegetable Nursery | Vegetable Rate
Nursery Business : चांगल्या रोपांपोटी...

या नुकसानीतून सावरण्याच्या अगोदरच भाजीपाल्याचे दरही खाली आले. भाजीपाल्याची नवी लागवड रखडली. विशेष करून भाजीपाला पट्ट्यात तर लागवड अत्यंत मंद गतीने होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. याचाच परिणाम रोप मागणीवरही झाला आहे. खर्चा इतके उत्पन्नही निघत नसल्याने भाजीपाला उत्पादकांनी सध्या, तरी भाजीपाला लागवडी नियोजन लांबणीवर टाकले आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील शेकडो रोपवाटिकांमधून राज्यभरात भाजीपाला लागवडीसाठी रोपे जातात. पण गेल्या एक महिन्यापासून या रोपवाटिकांमधून वर्दळ पूर्णपणे थंडावली आहे. बाहेरची मागणी नसल्याने रोपवाटिका चालकांनी अगदी लागतील तितकीच रोपे तयार करण्यास प्राधान्य दिले आहे. पण ही रोपेही वेळेत जात असल्याने रोपांचा कालावधी वाढून रोपांचे नुकसान होत आहे.

व्यवस्थापन खर्च वाढून नुकसान

गेल्या दोन वर्षांत कोरोनानंतर रोपांच्या मागणीत कमी- जास्तपणा होता. पण गेल्या महिन्याभरात मात्र मागणीत सातत्याने घट असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले. मागणी नसल्याने व्यवस्थापन खर्च वाढत आहे. सध्या टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबी हिरवी मिरची आदींसह अन्य भाजीपाल्याच्या रोपांनाही मागणी घटल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले.

गेल्या महिन्याभरात रोपांची मागणी रोडावली आहे. यामुळे गरजे इतकीच रोपे तयार करण्याला प्राधान्य आहे. बाजारपेठेत भाजीपाला दर नसल्याने शेतकरी नव्या लागवडी करण्यास अनुत्सुक आहेत.

- शिवाजीराव कचरे, रोपवाटिका चालक

सध्या राज्यात भाजीपाला लागवडीचा हंगाम असला तरी मागणी ठप्प असल्याने रोपवाटिका आर्थिक अडचणीत जात आहेत. अजून किती दिवस मागणी येणार नाही, हे आत्ताच सांगणे अशक्य आहे.

- उमेश पाटील, रोपवाटिका चालक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com