Sugarcane  Agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetti : ऊसदर नियंत्रण समितीच्या स्थापनेसह अनुदानावर निर्णय घ्या

Sugarcane FRP : ऊसदर समिती स्थापन न झाल्यामुळे राज्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांनी अद्याप उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिलेला नाही. शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये साखर कारखानदार बिनव्याजी वापरत आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : ऊसदर नियंत्रण समितीच्या स्थापनेसह शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानावर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी जनता दरबारातच मुख्यमंत्र्यांना जाब विचारतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता. ९) दिला. या संदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

श्री शेट्टी म्हणाले, की राज्य सरकारने ऊसदर नियंत्रण समिती न नेमल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. राज्य सरकारला आम्ही गेल्या वर्षभरापासून या संदर्भात वेळोवेळी ऊसदर नियंत्रण समितीची स्थापना करण्यासाठी मागणी केलेली आहे.

ऊसदर समिती स्थापन न झाल्यामुळे राज्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांनी अद्याप उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिलेला नाही. शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये साखर कारखानदार बिनव्याजी वापरत आहेत. तसेच राज्य सरकारने गेल्या १४ महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम अद्यापही दिलेली नाही.

आम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी मागणी केली आहे. तातडीने प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणेसंदर्भात आदेश व्हावेत. ही देखील आमची आग्रही मागणी आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे, कोल्हापूर जिल्ह्यात जनता दरबार घेत आहेत. आमच्या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास जनता दरबारात हजार शेतकऱ्यांच्या साक्षीने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी आम्ही जाब विचारू, शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केले आहे.

या संदर्भात शासनाने तातडीने खुलासा करावा. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याअगोदर प्रश्‍न मिटला नाही. तर स्वाभिमानी स्टाइलने आंदोलन करू, असा इशाराही शेट्टी यांनी या वेळी दिला. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, जनार्दन पाटील, सागर संभूशेटे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

District Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत ११६ वैध, तर ४४ अर्ज अवैध

Bhama Askhed Dam: भामा-आसखेडचे आवर्तन लांबणीवर

Farmers Demand: पीक विम्यातील ‘ट्रिगर’ काढून पाठीत खंजीर खुपसला

Seed Germination Testing: दर्जेदार रोपांसाठी बियाण्यांची उगवणक्षमता, जोम महत्त्वाचा

Brown Biorefinery: शेतावरील ‘ब्राउन बायोरिफायनरी’

SCROLL FOR NEXT