Raju Shetti
Raju ShettiAgrowon

Raju Shetti : ‘स्वाभिमानी’ सहा ठिकाणी लढणार लोकसभा निवडणूक

Loksabha Election : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडायची असेल, तर लोकसभेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राज्यातील सहा ठिकाणी आगामी लोकसभा निवडणूक लढू.
Published on

Sangli News : ‘‘शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडायची असेल, तर लोकसभेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राज्यातील सहा ठिकाणी आगामी लोकसभा निवडणूक लढू. मतदार संघात लोकांची मागणी पाहूनच उमेदवार निश्‍चित केले जातील, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

सांगली येथे गुरुवारी (ता.२५) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शेट्टी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे प्रश्‍न आजही सुटलेले नाहीत. त्यामुळे त्या प्रश्‍नांना वाचा फोडायची असल्याने लोकसभेसाठी कोल्हापूर, सांगली, माढा, परभणी, बुलडाणा या ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येतील.

Raju Shetti
Raju Shetty : शेतीला बारा दिवस वीज मिळावी यासाठी शाहूवाडीत मोर्चा

हातकणंगले मतदार संघात स्वतः निवडणूक लढविणार आहे. रविकांत तुपकर यांचीही उमेदवारी निश्‍चित केली आहे. त्याशिवाय अन्य मतदार संघांत लोकांची मागणी पाहून उमेदवार निश्‍चित केले जातील. सांगलीत महेश खराडे किंवा लोकांच्या मागणीतून उमेदवार दिला जाईल.’’

‘‘राज्यात सहकार व अनेक क्षेत्रांत मोठा भ्रष्टाचार आहे. चौकशी करायची असेल तर या सर्वांचीच करा. फक्त विरोधक आहेत म्हणून चौकशी करू नका. यामध्ये माझीसुद्धा चौकशी करायची असेल तरी खुशाल करा.

Raju Shetti
Raju Shetti : राज्यात शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्‍न दुर्लक्षितच

मात्र भाजपमध्ये येण्यासाठी दबाव तंत्र वापरू नका. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. परंतु राज्यकर्त्यांकडून त्यांना कोणतीही मदत किंवा विचारपूस केली जात नाही. त्यामुळे आता या राज्यकर्त्यांच्या विरोधात शेतकरी आवाज उठवेल,’’ असा इशारा शेट्टी यांनी दिला.

कोल्हापुरात ४ जून रोजी पहिले नांगरट साहित्य संमेलन

‘‘कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषा भवन सभागृहात ४ जून रोजी पहिले नांगरट साहित्य संमेलन होईल. या संमेलनाचे उद्‍घाटक वात्रटीकाकार व साहित्यिक रामदास फुटाणे असतील. तर प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ हे संमेलनाध्यक्ष आहेत,’’ असेही श्री. शेट्टी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com