Sugarcane FRP : संपलेल्या हंगामासाठी टनाला साडेतीन हजार रुपये दर द्या

Sugarcane producer : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संपलेल्या हंगामातील उसाला प्रतिटन ३ हजार ५०० रुपये दराची मागणी करावी. तसे अभियान शेतकरी संघटना राबवणार आहे.
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon
Published on
Updated on

Sangli Sugarcane News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संपलेल्या हंगामातील उसाला प्रतिटन ३ हजार ५०० रुपये दराची मागणी करावी. तसे अभियान शेतकरी संघटना राबवणार आहे.

मागणीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांविरुद्ध जुलैपासून आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेतल्याची माहिती संजय कोले यांनी दिली.

काही मंडळी कारखान्यांमधील अंतराची अट काढा म्हणताहेत. पण झोनबंदी नसल्याने शेतकरी कुठेही ऊस घालू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

Sugarcane FRP
FRP Issue : सोलापूर जिल्ह्यात ‘एफआरपी’ देण्याची गती संथच

शेतकरी संघटनेची नुकतीच बैठक झाली. शेतकरी नेते, साखर धंद्याचे अभ्यासक, शरद जोशींचे सहकारी दिवंगत अजित नरदे यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.

कोले म्हणाले, की शेतकऱ्यांना वीज दरात सबसिडी देतात हा भ्रम असून, ठराविक युनिट, हॉर्सपॉवर, घरगुती, व्यावसायिक, लघुदाब, ऊच्चदाब असा वीजदरातील फरक बंद करून एकसमान दराने सर्वांना वीज द्यावी.

म्हणजे शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळेल व सरकारी वीज कंपन्यांचा भ्रष्टाचार उघड होईल. उत्पादन वाढून विजेचे दर खाली येतील.

अणूवीज प्रकल्प होऊ नये म्हणून कोळसा खाण सम्राट १५०० कोटी रुपये राज्यकर्त्याना देण्याची तयारी दर्शवतात. या पैशांवरून राजकारण्यांत वाद होतात. ही गंभीर बाब असून, अणूप्रकल्प न झाल्यास कमी दरात पुरेशी वीज मिळणे शक्य होणार नाही. हे शेतकऱ्यांनी ध्यानात घ्यावे. हे प्रकल्प होण्यासाठी रेटा वाढवावा लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com