wild animal Agrowon
ताज्या बातम्या

Wild Animal Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

Latest Agriculture News : जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढत असून शेतीपिकाचे नुकसान करीत आहेत. आता शासनाकडून अशा शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला जात आहे.

Team Agrowon

Dharashiv News : जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढत असून शेतीपिकाचे नुकसान करीत आहेत. आता शासनाकडून अशा शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला जात आहे. मदत कशी आणि कुठे मिळणार याची प्रतिक्षा जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला लागली आहे.

जिल्ह्यामध्ये दुष्काळाचे मोठे सावट आहे. पावसाने २४ दिवसांचा खंड दिल्याने सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होणार आहेत. अशा स्थितीत शेतीपिकांना वन्यप्राण्यांचा त्रास सुरू झाला आहे. रानडुक्कर, हरीणांकडून शेतीपिकांची नासाडी होत आहे. परिणामी शेतकऱ्याच्या संकटात भर पडत आहे.

जिल्ह्यात वनक्षेत्र कमी प्रमाणात आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. शिवाय अवर्षण परिस्थितीमुळे तेथील पाणीसाठे कोरडे पडत आहेत. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शेतात येत आहेत. हरिण, रानडुक्कर यांचे कळप मोठे असल्याने पिकांचे मोठे नुकसान होते. शिवाय अशा प्राण्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते.

तर त्यांची शिकार करणारे अन्य वन्यप्राणी नसल्याने हरिण, रानडुकरांची संख्या वाढत आहे. त्यांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्याची गरज शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात काही प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे.

या क्षेत्रावर रानडुकरे धुमाकूळ घालून नासाडी करीत आहेत. एकाच दिवसात एक ते अर्धा एकर क्षेत्रावरील उसाची नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.

कशी मिळवावी आर्थिक मदत

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तीन दिवसांमध्ये तक्रार अर्ज तालुका स्तरावरील वनक्षेत्र अधिकारी, वनपाल यांना द्यावा लागतो. शिवाय ऑनलाइन तक्रारही करावी. त्यानंतर संबंधित अधिकारी कृषी सहाय्यक आणि तलाठी यांच्यामार्फत पंचनामा केला जातो.

अर्जाची छाननी करून संबंधित शेतकऱ्यांना मदत दिली जाते. चारशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत दिली आहे. अजूनही काही शेतकऱ्यांचे अर्ज येत आहेत.
- बी. ए. पोळ, विभागीय वनअधिकारी, धाराशिव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Committee Extension: मुदतीनंतरही पुन्हा मुदतवाढ

Goat Health: शेळ्यांतील देवी लशीत राज्य स्वयंपूर्णतेकडे

Ghod River Water Scarcity: घोड नदी आटण्याच्या उंबरठ्यावर

Mango Fruit Drop Issue: तापमानवाढीमुळे आंबा फळगळ वाढली

Wildlife Census: बुद्धपौर्णिमेला वन्यप्राण्यांची प्रगणना

SCROLL FOR NEXT