Digital Govarnance Agrowon
ताज्या बातम्या

Rural Development : डिजिटल कारभाराद्वारे आम्हीही देऊ गावाच्या विकासात योगदान

ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या प्रशिक्षणानंतरच्या भावना

टीम ॲग्रोवन

मुंबई : ग्रामपंचायतीच्या (Grampanchayat) माध्यमातून आम्हीही गावाच्या विकासात (Rural Development) योगदान देऊ शकतो आणि डिजिटल कारभारातही (Digital Governance) आम्ही मागे राहणार नाही. सरपंचासाठी असलेल्या डिजिटल सहीचा दक्षतापूर्व व प्रभावीपणे वापर करू, असा आत्मविश्वास राज्यातील ग्रामपंचायत महिला (Mahila Grampanchayat Member) सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षणानंतर अनेक महिला सदस्यांनी व्यक्त केला.

विविध जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या जानेवारी २०२१ मध्ये निवडणुका पार पडल्या. यात सुमारे १६ हजार महिला सदस्य निवडून आल्या होत्या. त्यांना ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती व्हावी, या उद्देशाने ‘पंचायत कारभार परिचय’ प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

राज्य निवडणूक आयोग, इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन फॉर गुड गर्व्हनन्स, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हल्पमेंट या संस्थांच्या वतीने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या बचत गटांतील ८० महिलांची प्रारंभी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांना रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हल्पमेंटकडून प्रशिक्षण देण्यात आले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुकास्तरावरील बचत गटांच्या फेडरेशनच्या (सीएमआरसी) माध्यमातून ग्रामपंचायत महिला सदस्यांशी गावपातळीवर समन्वय साधण्यात आला. त्यामाध्यमातून ऑनलाइन पद्धतीने हे प्रशिक्षण देण्यात आले. तांत्रिक सुविधांचा अभाव असलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. एकूण ५०० बॅचेसच्या माध्यमातून १६ हजार महिला सदस्यांना हे प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य होते. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली.

प्रशिक्षणानंतर अनेक ग्रामपंचायत महिला सदस्यांनी प्रसिक्षणासंदर्भात उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ‘ग्रामपंचायतीचा कारभार, सभा-बैठका, ग्रामविकास समित्या, अर्थव्यवस्थापन, ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या जबाबदाऱ्या, सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे कर्तव्ये इत्यादीसंदर्भातील सर्वंकष माहिती अत्यंत सोप्या भाषेत या प्रशिक्षणामुळे मिळू शकली,’ असे जळगाव जिल्ह्यातील श्रीमती आशा जाधव यांनी सांगितले. ‘मी सरपंच असून माझ्या मनात डिजिटल सहीसंदर्भात काही प्रश्न होते. त्यांची अत्यंत सुलभपणे प्रशिक्षणात उत्तरे मिळाली. त्यामुळे मी आता लक्षपूर्वक आणि प्रभावीपणे डिजिटल सहीचा वापर करू शकेन,’ अशी प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातील वैशाली पाटील यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Sulabh Seva Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT