Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे मृत पशुधनासाठी मिळणार मदत

‘लम्पी स्कीन’ आजार होऊन मृत झालेल्या पशुधनासाठी पशुपालकांना आर्थिक मदत मिळणार आहे. यासाठी राष्‍ट्रीय आपत्ती धोरणानुसार राज्य शासनाच्या १०० टक्के अर्थसहाय्यातून ही मदत दिली जाईल.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon
Published on
Updated on

पुणे ः ‘लम्पी स्कीन’ आजार (Lumpy skin Disease) होऊन मृत (Animal Died Due To Lumpy Skin) झालेल्या पशुधनासाठी पशुपालकांना आर्थिक (Financial Relief For Animal Death Due To Lumpy Skin) मदत मिळणार आहे. यासाठी राष्‍ट्रीय आपत्ती धोरणानुसार (National Disaster Policy) राज्य शासनाच्या १०० टक्के अर्थसहाय्यातून ही मदत दिली जाईल. या साठीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. दूधाळ पशुधनासाठी (Milch Livestock) ३० हजार, ओढकाम करणाऱ्या पशुधासाठी (बैल) २५ हजार, तर वासरांना १६ हजार रुपये मदत मिळेल. ही मर्यादा अनुक्रमे तीन, तर वासरांसाठी ६ ठेवण्यात आली आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : देशभरात ‘लम्पी’मुळे सुमारे ५७ हजार गायींचा मृत्यू

मदत देण्यासाठी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. निवासी जिल्हाधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा पशुचिकित्सालयांचे प्रमुख समितीमध्ये असेल.

३२ कोटी ५० लाखांची तरतूद

लम्पी स्कीन आजार राज्यात १२६ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. या पशुधनासाठी मदतीबाबत कोणतेही निकष नव्हते. या बाबत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यानुसार राज्य सरकार मदत देणार आहे. यासाठी ३२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com