Agrowon Exhibition
Agrowon Exhibition Agrowon
ताज्या बातम्या

Agrowon Exhibition : शेतकरी कंपन्यांच्या उत्पादनांना ग्राहकांची पसंती

Team Agrowon

‘ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात (Agrowon Agriculture Exhibition) शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनांना (FPC Produce) मोठी पसंती मिळत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील १५ हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांची दालने या प्रदर्शनात असून, दिवसभर या दालनांमध्ये शेतकऱ्यांची रेलचेल सुरू आहे.

औरंगाबाद येथील कोनेवाडी शेतकरी उत्पादक कंपनीचे दालन येथे असून, त्यात शेतकऱ्यांनी तयार केलेले पदार्थ विक्रीस ठेवले आहेत. विलास बेहरे कंपनीचे संचालक असून, ३११ सभासद आहेत.

कंपनीतर्फे कृषी सेवा केंद्र, कंत्राटी शेती, माती परीक्षण, (Soil Test) स्वयंचलित हवामान केंद्र आदी उपक्रम राबविले जातात. त्याची माहिती येथे देण्यात येत आहे. फुलंब्री येथील रामानंद गृह उद्योग आणि मल्टिसर्व्हिसेस या कंपनीचेही दालन येथे आहे.

यात महिलांनी विविध डाळींपासून तयार केलेल्या पदार्थांना मोठी मागणी आहे. श्री शाकंभरी महिला शेतकरी बचत गट, नृसिंह कृषी विकास, खर्डा, पैठण, कृषी समर्पण, बिडकीन, ता. पैठण, सुवर्णसृष्टी, ओम ॲग्रो (वेरूळ), विंटेज, दर्जेदार कल्याण ॲग्रो सर्व्हिसेस आदी कंपन्यांच्या दालनातील पदार्थांनाही पसंती मिळते आहे.

श्री व्हिला प्रॉडक्शनतर्फे भोसले यांना अवजार भेट

‘सकाळ ॲग्रोवन’च्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनात रविवारी (ता. १५) श्री व्हिला पॉली प्रॉडक्शनच्या वतीने व्ही. पास कृषी अवजार विजेते शेतकरी संजय भोसले (जडगाव) यांना भेट देण्यात आले.

या वेळी ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, सकाळ मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने, ॲग्रोवनचे उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले आणि श्री व्हिला प्रॉडक्शनचे संचालक श्री. भराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘अन्नपूर्णा ॲग्रो’तर्फे नांगराचे वितरण

‘सकाळ ॲग्रोवन’च्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनात अंकुश रघुनाथ पाटील औताडे यांना अन्नपूर्णा ॲग्रो सर्व्हिसेसच्या स्टॉलवर बलवान ऑटो पलटी नांगरचे वितरण करताना ‘ॲग्रोवन’चे उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले, अन्नपूर्णा ॲग्रो सर्व्हिसेस, औरंगाबादचे संचालक नंदकिशोर गिरी, बकाल पाटील आदी.

कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी ‘लकी ड्रॉ’

औरंगाबाद येथे सुरू असलेल्या ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात ‘लकी ड्रॉ’द्वारे भाग्यवंत ठरलेल्या १३० पेक्षा अधिक विजेत्या शेतकऱ्यांना आतापर्यंत बक्षिसांचे वाटप करण्यात आले. प्रदर्शनाला भेट देणारे शेतकरी कूपन भरून ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये टाकत आहेत. त्यातून ‘लकी ड्रॉ’ काढला जात आहे.

त्यातून भाग्यवान शेतकरी निवडले जात आहेत. बक्षिसांमध्ये इफ्को कंपनीचा नॅनो युरिया, उपयुक्त कृषी अवजारे, चिकट सापळे, कीडनाशक फवारणी वेळी वापरावयाचा पोशाख,. एसआरपी स्पायसेस कंपनीचे मसाले, यूएसके ॲग्रो कंपनीची उत्पादने, वार्षिक दिनदर्शिका, ‘पारस’ कंपनीची दुधासाठी वापरावयाची किटली आदींचा समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT