Agrowon Exhibition : ‘महाऊर्जे’च्या दालनावर वीज बचतीचा संदेश

महाराष्ट्र शासनाची संस्था असणाऱ्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या (महाऊर्जा) दालनात शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे.
Agrowon Exhibition
Agrowon ExhibitionAgrowon
Published on
Updated on

औरंगाबाद ः महाराष्ट्र शासनाची संस्था असणाऱ्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या (महाऊर्जा) (Mahaurja) दालनात शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची (Agriculture Schemes) माहिती दिली जात आहे.

या ठिकाणी शेतकरी, नागरिकांना विजेचा वापर कसा करावा, पाच स्टार असलेल्या उपकरणांचा वापर करून ऊर्जा बचत, वेळेवर स्वीच बंद करणे, वातानुकूलित यंत्रे, पंखा वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे, वीज कशी वाचवात (Energy Saving) येईल याचा संदेश दिला जात आहे. महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत पंतप्रधान कुसुम योजनेची परित्रकाद्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात आली.

Agrowon Exhibition
Agrowon Exhibition : शेतकऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही उदंड प्रतिसाद

‘आत्मा’च्या दालनावर पौष्टिक तृणधान्याचा प्रसार

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत ‘आत्मा’तर्फे कृषी प्रदर्शनात शेतकरी गट, कृषी उत्पादक कंपन्या अशी विविध प्रकारची अकरा दालने आहेत. शिवाय कृषी विभागाचेही स्वतंत्र दालन असून, त्या ठिकाणी यंदाच्या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ ची माहिती, वर्षभर राबवले जाणारे उपक्रम शेतकऱ्यांना सांगितले जात आहेत.

या दालनात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी अभ्यास दौरे, पीक प्रात्यक्षिक, कृषी सल्ला प्रात्यक्षिक, किसान गोष्टी, शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद, शेतीशाळा तसेच योजनांच्या माहितीचे प्रदर्शन करण्यात आले आहे.

Agrowon Exhibition
Agrowon Exhibition : शेतीउपयोगी माहिती, आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकरी भारावले

‘इफ्को’च्या दालनावर नॅनो युरियावर मार्गदर्शन

युरियाला पर्याय म्हणून इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थात ‘इफ्को’ने नॅनो युरिया (द्रवरूप) तयार केला आहे. या नॅनो युरियाची माहिती ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनातील इफ्कोच्या दालनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जात आहे.

या ठिकाणी प्रामुख्याने नॅनो युरियाची वैशिष्ट्ये, नॅनो युरिया म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये, नॅनो युरिया वापराची प्रमाण पद्धती, नॅनो युरियाचा वापर केल्याने होत असलेले फायदे अशा प्रकारची माहिती उपलब्ध केलेली आहे.

सागरिका हे पीक उत्पादन वाढीसाठी पोषक आहे. त्याच्या वापरामुळे होत असलेले फायदे, उपयोग याची इत्थंभुत माहिती देण्यात येत आहे.

ग्रीन रिव्होल्यूशनच्या दालनावर कामगंध सापळ्यांचे विविध प्रकार

कामगंध ल्युअर्स क्षेत्रात राज्यात काम करणाऱ्या ग्रीन रिव्होल्यूशनचे दालन औरंगाबाद येथे अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात असून, या ठिकाणी शेतकऱ्यांना विविध माहिती दिली जात आहे.

ग्रीन रिव्होल्यूशन मेलन फ्लाय ल्यूअर, फ्रूट फ्लाय ल्यूअर, हेलिक -ओल्यूअर (शेंगा/फळे पोखरणारी अळी), स्पोड ओ ल्यूअर (पाने खाणारी अळी), एफ.ए.डब्ल्यू. ल्यूअर (अमेरिकन लष्करी अळी), वाय एसबी ल्यूअर (भातावरील पिवळा खोड किडा), शुगर केन ईएसबी ल्यूअर (उसावर लवकर येणारा खोडकिडा), ब्रिंजल ल्यूअर, टू-टॉम ल्यूअर, डीबीएम ल्यूअर, गुलाबी फ्लाय ल्यूअर, बीटल ल्यूअर, रेड पाम ल्यूअर, व्हाइट ग्रब ल्यूअर अशा विविध कामगंध सापळ्यांच्या क्षेत्रात काम करते. या उत्पादनांची माहिती प्रदर्शनात शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.

पद्‌मलक्ष्मीच्या दालनावर प्रेसिजन प्लांटरचे आकर्षण

परदेशी बनावटीचे एसपी प्रेसिजन प्लांटर हे यंत्र कृषी प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. श्री पद्‌मलक्ष्मी ट्रॅक्टर्स प्रा. लि. यांच्या दालनात ठेवलेल्या या यंत्राची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

हे यंत्र कांदा, गाजर, फुलकोबी, लीक, मुळा, पालक, पार्सनिक, ब्रोकोलीसह इतर पिकांच्या बीजनासाठी वापरता येते. शिवाय बारीक बी असणाऱ्या हरभरा, तूर, तीळ, नाचणी, मोती बाजरी, ज्वारी, टोमॅटो, मोहरी, रेपसीड, काकडी, कोथिंबीर, तर मोठ्या बिया असलेल्या कापूस, मका, भुईमूग, एरंडी, सूर्यफूल, सोयाबीन, खरबूज, कस्तुरी खरबूज, जवस, हिरवे वाटाणा, बार्ली (सातू) अशा पिकांच्या लागवडीला योग्य असल्याची माहिती श्री पद्‌मलक्ष्मी ट्रॅक्टर्सच्या संचालकांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com