Krishi Din Agrowon
ताज्या बातम्या

Adarash Gaon : विदर्भातील गावे आदर्श करण्यासाठी सहयोग द्या

Rural Development : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या निर्मितीमध्ये (कै.) वसंतराव नाईक यांचे धोरणात्मक योगदान आहे.

Team Agrowon

Akola News : ‘‘राज्यातील कृषी विद्यापीठांच्या निर्मितीमध्ये (कै.) वसंतराव नाईक यांचे धोरणात्मक योगदान आहे. त्यांना अभिप्रेत कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याची चतुःसूत्री विद्यापीठांनी अंगीकारली. तसेच शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी आपली कार्य पद्धती काळानुरूप स्वीकारली.

सर्वार्थाने शाश्वत ग्रामविकास साध्य करण्यासाठी विदर्भातील प्रत्येक गाव आदर्श करण्याच्या विद्यापीठाच्या संकल्पनेला सहयोग द्यावा,’’ असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

कृषिदिन तसेच (कै.) वसंतराव नाईक यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त ‘पंदेकृवि’च्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रा. जयसिंग जाधव, विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेश हरणे आदी उपस्थित होते.

जाधव यांनी वसंतराव नाईक यांच्या स्मृती जागविल्या. ते म्हणाले, ‘‘जमीन सुधारणा कायदा, रोजगार हमी योजना, कापूस खरेदी योजना, साखर कारखान्यांची निर्मिती यासह पाझर तलाव, नालाबंडिंग अशी नानाविध उपक्रमांची मालिका नाईक यांनी आपल्या कार्यकाळात राबविली. राज्याला देशपातळीवर अग्रस्थानी नेण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.’’ प्रा. संजीवकुमार सलामे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुहास मोरे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT