Agriculture Department : अनधिकृत निविष्ठांकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष

Kharif Season : खरीप हंगामात अनधिकृत बियाणे विक्री, लिंकींगचे प्रकार सर्रास घडतात. त्यासोबतच नजीकच्या काळात एचटीबिटी विक्रीआड देखील शेतकऱ्यांच्या फसवणुकीत वाढ झाली आहे.
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon
Published on
Updated on

Amravati News : खरीप हंगामात अनधिकृत बियाणे विक्री, लिंकींगचे प्रकार सर्रास घडतात. त्यासोबतच नजीकच्या काळात एचटीबिटी विक्रीआड देखील शेतकऱ्यांच्या फसवणुकीत वाढ झाली आहे. त्याची दखल घेत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून त्याचे परवाने रद्द करावे, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.

गुरुवारी (ता.२९) त्यांनी या संदर्भाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना पत्र पाठवित ही मागणी केली. पत्रानुसार, गेल्या काही वर्षात वातावरणातील बदलाच्या परिणामी पाऊस कधी धो-धो बरसतो, तर कधी मोठा खंड पडतो.

त्यामुळे उत्पादकता प्रभावीत झाली आहे. उत्पन्नावरही याचा परिणाम दिसून येत आहे. अशातच अनधिकृत किंवा बोगस निविष्ठांचा बाजारात शिरकाव होत.

Department Of Agriculture
Bogus Seed : यवतमाळला बोगस खतांच्या १९३ पिशव्या जप्त

त्याची विक्री झाल्यास शेतकऱ्यांचा पूर्ण हंगाम नासतो. दुबार पेरणीकरिता पैशाची सोय करताना त्यांची चांगलीच दमछाक होते. त्यांना सावकारांकडून अधिक दराने पैसा आणावा लागतो. ही बाब लक्षात घेता अशा प्रकारांवर नियंत्रणासाठी तत्काळ पावले उचलण्यात यावी आणि संबंधितांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. या शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यावेळी स्पष्ट होत असताना देखील कारवाई करण्यात आली नव्हती. अशा गंभीर प्रकाराकडे कृषी अधिकारी दुर्लक्ष करतात हे दुर्देवी आहे.
प्रतिभा धानोरकर, आमदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com