Nanded Weather Update
Nanded Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : नांदेडमध्ये पुन्हा शेकोट्या पेटल्या

Team Agrowon

Nanded Cold Weather Update: जिल्ह्यात तापमानाचा पारा (Temperature) वाढत असताना मागील काही दिवसापासून मात्र किमान तापमानात घट होत आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळी साडेआठ वाजता किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेकोट्या (Bonfire) पेटवाव्या लागल्या आहेत.

जानेवारी महिन्यानंतर जिल्ह्यात तापमानाचा (Temperature) पारा वाढून उन्हाचा चटका जाणवू लागत्या होत्या. त्यानुसार किमान तापमानातही वाढ होऊन तो २० अशांवर पोचला होता. परंतु मागील आठवड्यात सतत घट येत आहे.

गुरुवारी सकाळी किमान तापमाना १६.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. यात घट होऊन शुक्रवारी १३.२ अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली आला आहे. यामुळे जिल्ह्यात सध्या गारठा जाणवत आहे.

शेतात रब्बी पिकांना (Rabbi Crop Nanded) रात्रीच्या वेळी पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना या थंडीचा कडाका जाणवत आहे. रब्बीतील गहू, हरभरा या पिकांना वाढीसाठी पोषक असलेले वातावरण सध्या पीक काढणीच्या अवस्थेत निर्माण झाले आहे.

परिणामी पिकांच्या काढणीच्या अवस्थेत थंड वातावरण उपयोगाचे नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा आणखी खाली येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा उष्ण तर रात्रीला गार वातावरणाचा सामना करावा लागत आहे.

नांदेड जिल्ह्यातील तापमान स्थिती अशी...

जिल्ह्यात २४ जानेवारी रोजी किमान तापमान १९.२ अंश सेल्सिअस नोंदले होते. यानंतर यात सातत्याने घट येत आहे. २५ जानेवारी रोजी १८.८ अंश सेल्सिअस, २६ जानेवारी रोजी १८ अंश सेल्सिअस, २७ जानेवारी रोजी १७.४ अंश सेल्सिअस, २८ जानेवारी रोजी १६.० अंश सेल्सिअस, २८ जानेवारी रोजी १६.८ अंश सेल्सिअस, ३० जानेवारी रोजी १७.२ अंश सेल्सिअस तर ३१ जानेवारी रोजी १७.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Stock : खानदेशात जलसाठा चिंताजनक स्थितीत

Cooperative Election : लोकसभा झाली आता गावपातळीवरचं राजकारण तापणारं, ९१ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार

Krushi Vasant Abhiyan : ‘कृषी वसंत’ अभियानाला अकोला जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू

Indrayani River : पुन्हा फेसाळली इंद्रायणी नदी!, नदीत सोडले रसायनयुक्त पाणी

Sericulture Farming : वाशीम जिल्ह्यात रेशीम शेतीकडे वाढतोय कल

SCROLL FOR NEXT