Weather Update : दक्षिण मध्य महाराष्ट्रात कोकण, गारठा कमी

राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत असल्याने जानेवारी महिन्याच्या अखेरीस राज्यात थंडी असल्याचे दिसून आले. फेब्रुवारी महिन्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on
Updated on

पुणे : राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) चढ-उतार होत असल्याने जानेवारी महिन्याच्या अखेरीस राज्यात थंडी (cold) असल्याचे दिसून आले.

फेब्रुवारी महिन्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक आहे.

तर उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरी इतके राहणार असल्याचे हवामान विभागाने (Weather Department) स्पष्ट केले आहे.

Weather Update
Weather Update : पावसाच्या हजेरीनंतर दाट धुक्याचे साम्राज्य

हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी बुधवारी (ता. १) फेब्रुवारी महिन्यातील किमान तापमान आणि पावसाचा अंदाज जाहीर केला.

त्यानुसार देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी ते सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे.

ईशान्य भारतातील राज्ये, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरात पश्‍चिम किनारपट्टीच्या उत्तर भागात किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, अंतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे.

कमाल तापमानाचा विचार करता ईशान्य भारतातील राज्ये, पूर्व भारत, गुजरात आणि वायव्य भारताच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.

तर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिण भाग, मध्य प्रदेशाचा पश्‍चिम भाग आणि दक्षिणेकडील राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com