Mosambi Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Mosambi Disease : मोसंबीवर ‘मंद ऱ्हास ‘चे संकट

Team Agrowon

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Citrus Grinning : जालना : मराठवाड्यातील मोसंबी पिकावर मंद ऱ्हास (सीट्रस ग्रीनिंग) (Citrus Grinning) या जिवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

मोसंबी केंद्रातर्फे हाती घेण्यात आलेल्या निरीक्षणात जालना जिल्ह्यातील बदनापूर, अंबड, घनसावंगी आणि अंबड या तालुक्यांत मंद ऱ्हास रोगाचा प्रादुर्भाव १९ ते २३ टक्क्यांपर्यंत दिसून आला असल्याची माहिती मोसंबी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिली.

राज्यात मोसंबीचे क्षेत्र ५७,२४३ हेक्टर असून मराठवाड्याला मोसंबीचे आगर म्हटले जाते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत मोसंबीचे क्षेत्र ४०८८६ हेक्टरवर विस्तारले असून त्यापैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २१ हजार २५० हेक्टर, जालना जिल्ह्यात १७२५० हेक्टर तर बीड जिल्ह्यात २३८६ हेक्टर क्षेत्रावर मोसंबी आहे.

जालना जिल्ह्यातील मोसंबीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील क्षेत्र लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात सीट्रस इस्टेटची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे भूमिपूजनही काही दिवसांपूर्वी पार पडले.

मोसंबीवरील संकटाची मालिका लक्षात घेता सीट्रस इस्टेट व त्या माध्यमातून संशोधनाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

‘मंद ऱ्हास’चे संकटामुळे मोसंबीच्या झाडांमधील अन्न अन् पाणी वाहून नेणाऱ्या पेशी नष्ट होतात, झाडाची प्रतिकार क्षमता नष्ट होते, उत्पादन क्षमता घटून फळांचा आकार लहान पडतो असं तज्ञांचे म्हणणं आहे.

मोसंबी संशोधन केंद्राची विशेष मोहीम
मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख कृषी शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंद ऱ्हास नियंत्रणासाठी जनजागृती अभियान हाती घेण्यात आल्याची माहिती मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिली.

कृषी सचिव एकनाथ डवले अन् कुलगुरू इंद्रमणी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोसंबी केंद्रातर्फे विशेष अभियान सुरू केले.

घनसावंगी तालुक्यातील मूर्ती, लिंबी, आरगडे गव्हाण, जांबसमर्थ, पिंपरखेड (बू),चिंचोली, पिंपळगाव(कुं) आदी गावांना (ता. २६) जनजागृती अभियानांतर्गत भेट दिली गेली. बदनापूर तालुक्यातील अकोला निकलक वाल्हा आदी ठिकाणीही शास्त्रज्ञांनी भेटी दिल्या आहेत.


अलीकडच्या दोन वर्षांत मोसंबी लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मंद ऱ्हासचा प्रसार वाढू नये याकरिता लागवडीसाठी निरोगी रोपांचा वापर मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा शिफारशीत वापर, लागवडीचे शिफारशीत अंतर, सीट्रस सायला अन् कोळी किडीचे वेळीच नियंत्रण आदी बाबींकडे लक्ष दिल्यास मंद ऱ्हास या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत मिळते.
- डॉ. संजय पाटील,
प्रमुख शास्त्रज्ञ मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Bajarbhav : सोयाबीनला ६ हजार भाव देणं सरकारला शक्य; सरकारने १३ हजार कोटी खर्च केले तर सोयाबीनला ६ हजार भाव मिळेल

Chemical Fertilizer : रासायनिक खतांची लिकिंगसह खरेदी बंद

Soybean Crop Damage : परतीच्या पावसामुळे सोयाबीन पुन्हा पाण्याखाली

Nano Urea and Agricultural Drones : कृषीत नॅनो युरिया आणि कृषी ड्रोनच्या वापरामुळे क्रांती होतेय : केंद्रीय मंत्री जोशी

Nar-Par Valley : ‘नार-पार’मधील वाहून जाणारे पाणी करंजवण प्रकल्पात

SCROLL FOR NEXT