Eknath Shinde  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Crop Damage : सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत.

Team Agrowon

Cabinet Disicion : राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुर्वसन विभागाला दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.१६) राज्य मंत्रिमडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाच्या निर्णयाच्या कार्यवाहीची माहिती मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सतत होणाऱ्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे. त्यामुळे मोठ्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची हीच अडचण ओळखून राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय घेतला आहे.

सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकर मिळण्यास मदत होणार आहे.

अकोल्यात होणार पशू वैद्यकीय महाविद्यालय

अकोला येथे नवीन पशू महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.१६) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या महाविद्यालयातील ५६ शिक्षक, ४८ शिक्षकेतर संवर्ग अशी १०४ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच बाह्य स्त्रोताद्धारे ६० पदे अशी एकूण १६४ पदे नव्याने निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली. या पदांसह इतर अनुषंगिक खरेदी वगैरेसाठी मिळून ३१६ कोटी ६५ लाख एवढ्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील भाषणात जळगाव आणि अकोला जिल्ह्यात २ नवीन पशूवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या: विजय वडेट्टीवार यांची मागणी

Tur Disease Management : तूर पिकावरील करपा, वांझ रोगाचे व्यवस्थापन

Rice Stocks : यंदा तांदळाचा विक्रमी साठा, मोठ्या प्रमाणात निर्यातीची तयारी

Voter Fraud: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात मते वाढवली, निवडणूक आयोग मत चोरांसाठी काम करते; राहुल गांधी

Vegetable Farming Success : प्रशिक्षणातून भाजीपाला शेतीत तयार केला वार्षिक रोजगार

SCROLL FOR NEXT