Crop Damage In Hingoli : अवकाळी पावसामुळे ५८७ हेक्टरवरील पिके बाधित

Unseasonal Rain : हिंगोली जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट,वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे पूर्ण झाल्यानंतर महसूल, कृषी, ग्रामविकास विभागातर्फे सोमवारी (ता. ८) अंतिम बाधित क्षेत्र निश्‍चित करण्यात आले.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Hingoli Rain Update : यंदाच्या (२०२३) एप्रिल महिन्यात हिंगोली जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव या ४ तालुक्यांतील २ हजार ४८२ शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपीके मिळून एकूण ५८७.४४ हेक्टर क्षेत्रावरील ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी (ता. ८) एकूण ७७ लाख ६४० रुपये एवढ्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट,वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे पूर्ण झाल्यानंतर महसूल, कृषी, ग्रामविकास विभागातर्फे सोमवारी (ता. ८) अंतिम बाधित क्षेत्र निश्‍चित करण्यात आले.

त्यानुसार जिल्ह्यातील ज्वारी, उन्हाळी मूग जिरायती पिके ३८१.६४ हेक्टर, भाजीपाला, शेवगा, कांदा बागायती पिके ३१.६० हेक्टर, केळी, पपई, आंबा, मोसंबी फळपीके १७४.२० हेक्टर असे एकूण ५८७.४४ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.

Crop Damage
Unseasonal Rain : नैसर्गिक आपत्तीमुळे सहा कोटींचा फटका

हिंगोली तालुक्यातील १४३.८४ हेक्टरवरील उन्हाळी मूग, ६ शेतकऱ्यांचे ९.५० हेक्टरवरील भाजीपाला, ०.६० हेक्टर केळी असे एकूण १५३.९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. कळमनुरी तालुक्यातील ३३८ शेतकऱ्यांचे ४३.८० हेक्टरवरील रब्बी ज्वारी, ६६० शेतकऱ्यांचे ९२.५० हेक्टरवरील केळी, १.५० हेक्टर पपई, ०.२० हेक्टर आंबा, १.१० हेक्टर सूर्यफूल असे एकूण ९९९ शेतकऱ्यांचे १३९.५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

वसमत तालुक्यातील २८ शेतकऱ्यांच्या १० हेक्टर भाजीपाला, १ हेक्टर शेवगा, ७२६ शेतकऱ्याचे ६५ हेक्टरवरील केळी, ७ हेक्टर आंबा, ३ हेक्टर मोसंबी असे एकूण ७५४ शेतकऱ्यांचे ८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

सेनगाव तालुक्यातील ३०८ शेतकऱ्यांचे १९४ हेक्टरवरील मूग, २३ शेतकऱ्यांचे १० हेक्टर कांदा, १० शेतकऱ्यांचे ४ हेक्टर आंबा असे एकूण ३४१ शेतकऱ्यांचे २०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

बाधित शेतकऱ्यांना जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार ५०० रुपये नुसार एकूण ३२ लाख रुपये, बागायती पिकांसाठी १७ हजार रुपयेनुसार एकूण ५ लाख रुपये, फळपिकांसाठी २२ हजार ५०० रुपयेनुसार ३९ लाख रुपये आर्थिक मदत दिली जाईल.

Crop Damage
Unseasonal Rain : अवकाळी पाऊस बळिराजाचा पिच्छा सोडेना!

अवकाळी पाऊस नुकसान स्थिती

(क्षेत्र हेक्टरमध्ये, निधी लाख रुपयांत)

तालुका - बाधित शेतकरी संख्या- एकूण बाधित क्षेत्र - अपेक्षित निधी

हिंगोली - ३८८ - १५३.९४ - १३.९७६४०

कळमनुरी- ९९९- १३९.५०- २५.१९५००

वसमत - ७५४ - ८६- १८.७४५००

सेनगाव - ३४१ - २०८- १९.९०००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com