Tanaji Sawant Agrowon
ताज्या बातम्या

Ethanol Policy : केंद्र सरकारचे इथेनॉल धोरण हे मृगजळ

Ethanol Production : केंद्र सरकार एकीकडे अपारंपरिक ऊर्जेवर विजेच्या वाहनांना प्रोत्साहन देत आहे. दुसरीकडे इथेनॉलचे धोरण राबवीत आहे.

Team Agrowon

Pune News : ‘‘केंद्र सरकार एकीकडे अपारंपरिक ऊर्जेवर विजेच्या वाहनांना प्रोत्साहन देत आहे. दुसरीकडे इथेनॉलचे धोरण राबवीत आहे. आत्ता इथेनॉलचे टाकलेले प्रकल्प १० वर्षांनी बंद पडण्याचा धोका आहे. यामुळे केंद्र सरकारचे इथेनॉल धोरण हे मृगजळ आहे,’’ असे मत आरोग्यमंत्री आणि साखर उद्योजक तानाजी सावंत यांनी व्यक्त केले.

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (डीएसटीए) च्या ६८ व्या वार्षिक कार्यक्रमात रविवारी (ता. २४) मंत्री सावंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी ‘डीएसटीए’चे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष एस. एस. शिरगांवकर, एम. के. पटेल, एस. डी. भोकरे, गौरी पवार, राष्ट्रीय साखर संघाचे प्रकाश नाईकनवरे, ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू आदी उपस्थित होते.

सावंत म्हणाले,‘‘सहकारी साखर कारखानदारीत साम्राज्यवाद बोकाळला आहे. निवडक साम्राज्यवाद्यांच्या हातातून हा उद्योग बाहेर काढण्याची गरज आहे. साखर उद्योग व्यावहारिकरित्या चालवायचा असेल तर या साठी उच्चप्रशिक्षित कुशल अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज आहे.

यासाठी ‘डीएसटीए’ आणि ‘व्हीएसआय’ने काम करण्याची गरज आहे. तसेच साखरेच्या दरामध्ये ‘लेव्ही’ पद्धत आणण्याची गरज आहे. साखरेचे दर घरगुती वापरासाठीचे वेगळे आणि व्यावसायिक वापरासाठी वेगळे असणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत.’’

दरम्यान, या वेळी मंत्री सावंत यांच्या हस्ते साखर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच साखर उद्योगात योगदान दिलेल्या उद्योजक, तंत्रज्ञ, संशोधक, शेतकऱ्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. एस. बी. भड यांनी प्रास्ताविक केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT