Sugarcane Season
Sugarcane Season Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Season : साखर आयुक्तांच्या आदेशामुळे ऊस उत्पादकांना मोठा दिलासा

Team Agrowon

Nagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील लोकनेते मारुतराव घुले-पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून कपात करण्यात आलेली रक्कम शेतकऱ्यांना परत मिळणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

२०२१-२२ या गाळप हंगामात कारखान्याने शेतकऱ्यांच्या बिलातून प्रतिटन १०९.६५ पैसे रकमेची कपात केली होती. परंतु साखर आयुक्तांच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना ही रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकऱ्यांकडून कपात केलेली रक्कम कारखाना व्यवस्थापनाने ठेवीमध्ये रुपांतरीत केली होती. कारखान्याच्या या भूमिकेविरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्त्वामध्ये ऐन दिवाळी सणादिवशी नेवासा तहसिल कार्यालयासमोर चटणी भाकरी आंदोलन करण्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घातले होते. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना कारखान्याने केलेली कपात मान्य नाही, असे शेतकरी कपात केलेली रक्कम परत मिळविण्यासाठी कारखान्याकडे अर्ज करून पैसे परत मिळवू शकतात, अशा प्रकारचे आदेश साखर आयुक्तांनी काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT