Kolhapur News : देशातील साखर कारखान्यांनी एप्रिलअखेर ३२० लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. अजूनही साखर कारखाने सुरू असल्याने साखर उत्पादनात आणखी ७ लाख टनांची भर पडू शकते, असा अंदाज आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात व तमिळनाडू या पाच राज्यांनी आघाडी घेतली आहे.
या खालोखाल हरियाना, पंजाब आणि बिहारचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १०५.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रातला हंगाम पूर्णपणे संपला आहे. उत्तर प्रदेशात अजूनही ३८ साखर कारखाने सुरू आहेत. सध्या उत्तर प्रदेशात १०१ लाख टन साखर उत्पादित झाली आहे.
हंगाम संपेपर्यंत उत्तर प्रदेशचे उत्पादन महाराष्ट्राइतका होण्याचा अंदाज आहे. देशातील ५३१ साखर कारखान्यांपैकी ६७ कारखान्यात अजूनही ऊस गाळप सुरू आहे. कर्नाटकात ५५.५०, तमिळनाडू व गुजरातमध्ये अनुक्रमे १०.९५ व १०.१० लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे.
याशिवाय हरियानात ७.१५, पंजाबमध्ये ६.६५, बिहारमध्ये ६.४० लाख टन उत्पादन झाले आहे. या राज्यांशिवाय मध्य प्रदेशात ५, उत्तराखंडमध्ये ४.७५, तेलंगणात २.८०, आंध्र प्रदेशात २.३० व उर्वरित राज्यात १.५० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
देशात सर्वाधिक सरासरी साखर उतारा गुजरातमध्ये १०.८० टक्के आहे. त्या खालोखाल कर्नाटका १०.१०, तेलंगणा १०.१०, महाराष्ट्र १०, आंध्र प्रदेश ९.७०, बिहार ९.७० व उत्तर प्रदेश ९.६५ टक्के या राज्यांचा क्रमाक आहे.
एप्रिल अखेर देशात उसाचे सर्वाधिक गाळप उत्तर प्रदेशात १०५५.९६ लाख टन इतके झाले आहे. त्या खालोखाल महाराष्ट्रात १०५३ लाख टन गाळप झाले आहे. व कर्नाटकाचा ५४९.५० लाख टन गाळप झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.