Orange Orchard  Agrowon
ताज्या बातम्या

Orange Orchard : संत्रा बागांमध्ये मृग बहर फुटण्यास अडथळे

Orange Farming : सध्या पाऊस लांबल्याने या भागातील शेतकरी चिंतातूर आहेत. पेरण्या खोळंबलेल्या आहेत. दुसरीकडे संत्रा बागायतदारही कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत.

Team Agrowon

Akola News : सध्या पाऊस लांबल्याने या भागातील शेतकरी चिंतातूर आहेत. पेरण्या खोळंबलेल्या आहेत. दुसरीकडे संत्रा बागायतदारही कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत. संत्र्याचा मृग बहर फुटण्यात अडथळे निर्माण होत आहेत. काही शेतांमध्ये बहर फुटला, तर काही बागा सुप्तावस्थेत आहेत. सध्या वातावरण गरम असल्याने फुटलेल्या बागांमध्ये फूल गळतीचा फटका बसू शकतो.

शेतकरी संत्र्याचा बागांना मे महिन्यात ताणावर सोडतात. जूनमध्ये पाऊस सुरू होताच या बागांमध्ये बहर व्यवस्थापनाचे काम सुरू होत असते. यंदा काही ठिकाणी मे महिन्यात अवकाळी पाऊस झालेला आहे. त्यामुळे ताण तुटला. वास्तविक जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर बागांचा ताण सोडला जातो.

शेतकरी खत भराव करून पाण्याचे नियोजन करीत असतात. त्यावर बागांचे फुटणे अवलंबून असते. यंदा जून महिन्यात पाऊस झालेला नसल्याने संत्रा बागांमध्ये मृग बहर फुटण्यास अडथळे आलेले आहेत. काही शेतकऱ्यांच्या बागांमध्ये मृग बहर फुटला. काही बागा सुप्तावस्थेत असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात संत्रा बागांमध्ये अनियमित स्वरूपात बागांमध्ये मृग बहर फुटला आहे. वाशीमला काही शेतकऱ्यांनी वेळेवर नियोजन करीत बहर फोडण्यासाठी प्रयत्न केले.

वडजीला फोडल्या बागा

वाशीम जिल्ह्यातील वडजी हे गाव संत्रा उत्पादनात अग्रेसर होत आहे. या गावातील शेतकरी करडा केव्हीके तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनात शास्त्रशुद्ध नियोजन करीत असतात. यंदा पाऊस कमी असूनही या शेतकऱ्यांनी एकत्र येत विचारविनिमय करीत बागा फोडण्याचे नियोजन केले.

त्यातून या गावात २१ बागांमध्ये मृग बहर फोडण्यात शेतकऱ्यांना यश आलेले आहे. या शेतकऱ्यांनी १० जूनला हलका पाऊस झाल्यानंतर ११ जूनला विद्यापीठ शिफारशीनुसार खते भरली. त्यानंतर १२ जूनपासून बागेत पाणी सुरू केले. बागेत आर्दता तयार होण्यासाठी पाच ते सहा दिवसांतून तुषार सिंचन केले. याचा परिणाम पुढील १५ दिवसांत या सर्व बागांमध्ये बहर फुटला आहे. विशेष म्हणजे यातील एक बाग तर तीन वर्षांआतील आहे.

सध्या बऱ्याच बागा फुटल्या. काही सुप्तावस्थेत आहेत. यंदा कधी आर्द्रता, तर कधी तप्त वातावरण तयार होत आहे. शेतकऱ्यांना पाणी नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. अधूनमधून तापमान वाढत असून, हे वातावरण असेच राहिले तर फूल गळतीची शकता वाढू शकते.
-डॉ. दिनेश पैठणकर, प्रभारी अधिकारी, अ.भा.स.सं.प्र.(लिंबूवर्गीय फळे), डॉ.पंदेकृवि, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT